परभणी (. ) क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा दि. ३० ते ३१ ऑक्टोबर दरम्यान नांदेड येथे संपन्न झाल्या.
बाल विद्या मंदिर परभणी संघाने छत्रपती संभाजीनगर विभाग चे प्रतिनिधित्व करत मुंबई, नागपूर विभागास मात करून अंतिम फेरीत पुणे विभागास ३-१ सेट मध्ये पराभव करत सुवर्ण पदकांचा दावेदार ठरला.
सुवर्ण पदक प्राप्त संघात शिवनंदन मनोहर पुरी,
तनिष्कराज संजय प्रधान,
रुद्र माधव पाटील,
श्रीपाद चिंतामणी कोठेकर,
सोहम अशोकराव मोरे, या खेळाडूस मार्गदर्शन डी.पी. पंडित, प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांचे लाभले. याप्रसंगी नांदेड जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडजकर यांनी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आले असताना परभणी विजेता संघास खेळाडूंचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेच्या निवडीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी परभणी जिल्हा टे. .टे. सचिव गणेश माळवे, सहसचिव डी.पी.पंडीत,खेलो इंडिया टे .टे. प्रशिक्षक चेतन मुक्तावार, उपस्थित होते.
संस्था सचिव डॉ. विवेक नांवदर , जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे , संजय मुंढे, शैलेंद्र सिंग गौतम, यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा