माहूर (प्रतिनिधी )माहूर ग्रामीण रुग्णालयातील ३० पैकी १० रिक्त पदे त्वरित भरावे व एक कर्मचाऱ्यांची असलेली प्रतिनियुक्ती रद्द करावी अन्यथा दिनांक १७ ऑक्टोंबर पासून ग्रामीण रुग्णालय समोर उपोषणाला बसू असा इशारा माहूर येथील नगराध्यक्ष व १३ नगर सेवक यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
आदिवासी दुर्गम व डोंगराळ परिसर असलेल्या तीर्थक्षेत्र सारख्या माहूरच्या ठिकाणी ३० पैकी ११ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असणे हे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून दुर्दैवी आहे.
करिता आपणास विनंती की १५ दिवसात माहूर ग्रामीण रुग्णालयात रिक्त असलेली पदे कायमस्वरूपी भरून प्रतिनियुक्ती रद्द करावी अन्यथा खालील सह्या करणारे नगराध्यक्ष व माहूर शहरातील नगरसेवक दिनांक १७ ऑक्टोंबर पासून ग्रामीण रुग्णालय माहूर समोर समोर उपोषण करणार आहे असा इशारा आरोग्य मंत्री,पालक मंत्री,आयुक्त आरोग्य सेवा व सर्वसाबधिताना फिरोज दोसानी सह नगरसेवकांनी दिला आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा