किनवट - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार) बळीराजा शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १४ जागांवर दणदणीत विजय मिळवून बाजार समितीवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला आहे.काँग्रेसने भाजपच्या हातात 'हात' घेऊन अवलक्षण करून घेतल्याने काँग्रेसला ३, तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.माकप- वंचितचे पॅनल या निवडणुकीत भुईसपाट झाले. आमदार भीमराव केराम,माजी आमदार प्रदीप नाईक यांच्यासह काँग्रेस नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या किनवट बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी बुधवारी मतदान झाले.१५८८ पैकी १५४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.व्यापारी,सर्वसाधारण तसेच ग्रामपंचायत मतदारसंघात तिन्ही पॅनलमध्ये मोठी चुरस होती.कोट्यवधीची ' उलाढाल' झालेल्या या निवडणुकीत भाजपने काँग्रेस व शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेत १८ जागा लढविल्या.राष्ट्रवादीचे ( शरद पवार) माजी आमदार प्रदीप नाईक यांनी १५ जागी उमेदवार उभे केले,तर माकप - वंचित बहुजन आघाडीने ९ जागी उमेदवार उभे केले होते.गुरुवारी दि.१२ सकाळी बाजार समिती कार्यालयात ६ टेबलवर मतमोजणी झाली.सबंध जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या व्यापारी मतदारसंघाच्या अटीतटीच्या लढतीत भाजपचे दिनकरराव चाडावार यांचा पराभव झाला.सर्वसाधारण मतदारसंघातून काँग्रेस नेते नारायणराव सिडाम,माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार,अनिल सूर्यवंशी या मातब्बरांचाही पराभव झाला.राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी : सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ - बालाजी बामणे ( २६१ ), माजी सभापती अनिल पाटील कऱ्हाळे ( २५६),श्रीराम कांदे ( २४७ ),प्रेमसिंग जाधव ( २४५ ),गजानन मुंडे ( २४२),शेख हैदर मुसा ( २२६), सेवा सहकारी संस्था महिला राखीव - विद्या संतोष दासरवाड ( २७४), कुसूम गणपत मुंडे ( २४७),सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदारसंघ - प्रल्हाद सातव ( २५२), ग्रामपंचायत सर्वसाधारण - राजू सुरोशे ( ३२०), सुनील घुगे ( ३१४),ग्रामपंचायत अनुसूचित जाती - जमाती - अनुसया मनोहर पेंदोर ( ३३४ ), ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक - राहुल गेमसिंग जाधव - नाईक ( ३२४),व्यापारी - आडते प्रेमसिंग साबळे ( ८२ ), कैलास बिजमवार ( ७४ ). काँग्रेस - भाजप - शिंदे शिवसेना पॅनलचे विजयी उमेदवार व मिळालेली मते याप्रमाणे : सर्वसाधारण मतदारसंघ- सोपानराव केंद्रे काँग्रेस ( २३७), सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती - भटक्या जमाती मतदारसंघ - नवीन राठोड काँग्रेस ( २३३) हमाल - मापाडी मतदारसंघ - खिच्ची अब्दुल सत्तार काँग्रेस ( ९७),तर सर्वसाधारण मतदारसंघातून भाजपचे गजानन कोल्हे हे एकमेव उमेदवार विजयी ठरले.निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत मगर व त्यांच्या टीमच्या नियोजनामुळे दुपारी १ च्या आत निकालाची प्रक्रिया पूर्ण झाली.
किनवट बाजार समितीत 'राष्ट्रवादी पुन्हा' ! १४ जागेवर दणदणीत विजय ; भाजप आघाडीला ४ जागा

addComments
टिप्पणी पोस्ट करा