प्रतिनिधी, कंधार
--------------------
आयुष्यमान भारत योजने अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. या योजनेंतर्गत १ हजारांपेक्षा अधिक आजारांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपले आयुष्यमान कार्ड त्वरित काढून घ्यावे. जेणेकरून, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आवश्यक वेळस तात्काळ लाभ घेण्यास मदत होईल, असे आवाहन तहसीलदार राम बोरगांवकर यांनी केले आहे.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (केंद्र सरकार) व महात्मा फुले जन आरोग्य योजना (राज्य सरकार) या दोन्ही योजना एकत्रित करून आयुष्यमान भारत योजना राबविली जात आहे. यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकांना ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आपले नाव आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट आहे का? याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत १ हजारांपेक्षा अधिक आजारांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत उपचारांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड म्हणजेच आयुष्यमान कार्ड काढणे आवश्यक आहे.
आयुष्यमान भारत योजने अंतर्गत सहभाग नोंदवून आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी सीएमसी केंद्र, आपले सरकार केंद्र, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्र, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत, अंगीकृत खाजगी रुग्णालयातील आरोग्य मित्र यांच्याशी संपर्क साधावा. आता कोणताही लाभार्थी घरी बसून आपले आयुष्यमान कार्ड बनवू शकतो. आयुष्यमान कार्ड बनविण्याचे पाच सोपे टप्पे आहेत. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपले आयुष्यमान कार्ड त्वरित काढून घ्यावे. जेणेकरून, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आवश्यक वेळस तात्काळ लाभ घेण्यास मदत होईल, असे आवाहन तहसीलदार राम बोरगांवकर यांनी केले आहे.
- आयुष्यमान कार्ड कोण काढू शकते?
- • स्वतः लाभार्थी
- • आपले सरकार केंद्र
- • सीएमसी केंद्र
- • आशा स्वयंसेविका
- • शासकीय रुग्णालय
- • आरोग्य केंद्र
- • ग्रामपंचायत
- • आरोग्य मित्र
- आयुष्यमान कार्डचे फायदे
- • प्रती वर्ष ५ लाखा पर्यंत मोफत उपचार
- • १ हजारांपेक्षा अधिक आजारांवर उपचार
- • देशातील सर्व शासकीय रुग्णालयांचा समावेश
- • अंगीकृत खाजगी रुग्णालयात घेता येणार उपचार.
- आवश्यक कागदपत्रे
- • आधार कार्ड
- • रेशनकार्ड
- • मोबाईल नंबर
- • बायोमेट्रिक अंगठा
addComments
टिप्पणी पोस्ट करा