सुप्रसिद्ध कथाकार दिगांबर कदम आणि राम तरटे यांची उपस्थिती
नांदेड - येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शहरातील मूळ गाव तरोडा बु. जवळच्या सांदिपानी पब्लिक स्कूल परिसरात आज दि. २८ आॅक्टोबर रोजी कथाकथन आणि कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायं ७ वा ज्येष्ठ कथाकार तथा लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे प्रणेते दिगंबर कदम यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होणार असून यात सुप्रसिद्ध कथाकार तथा पत्रकार राम तरटे हे सहभागी होणार आहेत. त्यानंतर कविसंमेलनास प्रारंभ होणार आहे. ज्येष्ठ कवी प्रल्हाद घोरबांड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या काव्यमैफिलीत शहरातील व परिसरातील कवी कवयित्रींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा