धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर,अभिषेक सौदे, व्यंकटेश साठे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड




*भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप भाऊ कंदकुर्ते यांच्या विनंतीला मान देऊन धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर,अभिषेक सौदे, व्यंकटेश साठे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड केल्याबद्दल भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते व संपूर्ण भाजपा टीम यांच्या वतीने तिघांचा सत्कार करण्यात आला.

खा.चिखलीकर, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, यांच्या शिफारशीनुसार प्रदेशाध्यक्षांनी नियुक्तीपत्र दिले आहेत. दिलीप ठाकूर यांनी ९ वर्ष जिल्हा सरचिटणीस पदावर राहून वर्षभरात भाजप तर्फे ८२ उपक्रम सातत्याने राबवित आहेत.अभिषेक सौदे यांनी अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश सचिव पदावर राहून पक्ष संघटन वाढवले आहे.व्यंकटेश साठे यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून जनसामान्याचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे या तिघांना पदोन्नती देण्यात यावी देण्यात यावी यासाठी दिलीप कंदकुर्ते यांनी पाठपुरावा केला. महानगर कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले. महानगरच्या वतीने तिघांचा शाल व हार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महानगर सरचिटणीस शितल खांडील, विजय गंभीरे, अमोल कदम, साहेबराव गायकवाड, डॉ. शितल भालके,दिलीपसिंघ सोडी, उपाध्यक्ष बागड्या यादव, विनायक सगर, मंडलाध्यक्ष आशीष नेरलकर, अंबादास जोशी, मारोती वाघ, सुनील राणे,संतोष क्षिरसागर, विशंभर शिंदे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रद्धा चव्हाण, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बजरंग ठाकूर, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश लोट, उत्तर भारतीय आघाडी जिल्हाध्यक्ष संजीव जिंदल, सोशल मीडिया प्रदेश सदस्य राज यादव, कोषाध्यक्ष स्वप्निल गुंडावार, कार्यालय सचिव सतीश बेरुळकर,गोविंद महाराज,सुधाकर तीठे,यांच्यासह यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रदेश कार्यकारणीवर निवड झाल्याबद्दल ॲड. ठाकूर,सौदे, साठे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज