यशवंत ' मध्ये दि.२८ ऑक्टोबर रोजी वनस्पतीशास्त्राची विद्यापीठस्तरीय कार्यशाळा*

 

*'

 नांदेड:( दि.२७ ऑक्टोबर २०२३) 

          श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र आणि उद्यानविद्याशास्त्र विभागातर्फे ' इन्हांसिंग करीक्युलर इम्पॅक्ट: यूजी अँड पीजी डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन' या विषयावर एकदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे दि.२८ ऑक्टोबर २०२३, शनिवार रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

           या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख अतिथी संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ.एम.के.पाटील हे राहणार आहेत.समारोप सत्राचे प्रमुख अतिथी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रो.डॉ.बी.एस.सुरवसे हे आहेत.

           नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमाची रचना, अंमलबजावणी आणि परिणामांची सर्वांगीण आणि सविस्तर चर्चा करण्याच्या दृष्टीने आयोजित या कार्यशाळेस प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे; असे आवाहन निमंत्रक व मुख्य आयोजक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे,, समन्वयक वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.एस.एस.बोडके, आयोजक सचिव डॉ.एम.एम.व्ही.बेग, डॉ.साहेब शिंदे आणि आयोजक समिती सदस्य डॉ.ए.व्ही.जाधव, डॉ.सचिन पाटील, डॉ.सुरेश तेलंग, डॉ.आर.जी.चिल्लावार, डॉ.एस.बी.वानखेडे, डॉ.व्ही.ए.पावडे, आणि सौ.मनीषा बाचोटीकर यांनी केले आहे

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज