माणूस हीच माणुसकी शिकवणारी जात - भदंत पंय्याबोधी थेरो


धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरात महाबुद्धवंदनेचा कार्यक्रम; शेकडो बौद्ध युवक युवतींसह उपासक उपासिकांचा पुढाकार

नांदेड - पृथ्वीतलावर माणूस हीच एकमेव जात आहे. माणसांमध्ये जाती नसतात; त्या जनावरांत असतात. पशुपक्षांत असतात. वस्तू, पदार्थ, वनस्पती आदींसाठी जाती मानल्या जातात. माणूस हीच एकमेव जात आहे.‌ माणुसकी हाच एकमेव धर्म आहे आणि माणूस हिच माणूसकी शिकवणारी जात आहे असे प्रतिपादन येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित महाबुद्धवंदनेच्या कार्यक्रमात केलो. यावेळी भिक्खू संघासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची तसेच शुभ्र वस्त्र परिधान करून बौद्ध उपासक उपासिका, बालक बालिका, युवक युवतींची उपस्थिती होती. पुढे ते म्हणाले की, बुद्धाचा धम्म समानतेचा, करुणेचा आहे. मानवहितैषी आहे. आदी मध्य अंती कल्याणकारी आहे. त्यामुळे हजारो लोक बौद्ध होत आहेत असेही ते म्हणाले.
        ६७ व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ येथील शेकडो युवक युवतींच्या पुढाकाराने पुजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीत महाबुद्धवंदनेच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.‌  महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पुष्पवंदन करुन अभिवादन करण्यात आले.‌ उपासकांच्या याचनेवरुन भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या नेतृत्वाखालील भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. त्यानंतर त्रिरत्न वंदना घेण्यात आली. भिक्खू संघाच्या आशिर्वचनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका युवा वर्गाची उपस्थिती होती. शेकडो युवक युवतींनी महाबुद्धवंदनेसाठी पुढाकार घेतल्यामुळे आंबेडकरी तरुण आता धम्मचळवळीकडे वळला असल्याचे बोलले जात आहे.
उपस्थितांकडून बावीस प्रतिज्ञांचे शपथग्रहण 

महाबुद्धवंदनेनंतर उपस्थित बौद्ध उपासक, उपासिका, बालक, बालिका युवक युवतींनी मोठ्या आवाजात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा प्रसंगी तमाम आंबेडकरी अनुयायांनाना दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे अनुवाचन करण्यात आले. यावेळी भदंत पंय्याबोधी थेरो यांनी भिख्खू संघाच्या वतीने बावीस प्रतिज्ञांचे अनुवाचन केले आणि सर्व उपस्थितांनी उभे राहून त्या ग्रहण केल्या. त्या काटेकोरपणे पाळण्यात याव्यात असे आवाहनही भिक्खू संघाने यावेळी केले.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज