अध्यक्ष कैलास कदम, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचे आवाहन!
दिनांक ३१:महाराष्ट्र इंटकच्या कार्यकारीची जेम्बो मिटिंग रविवारी फोर्ट येथील इंटक कार्यालयात पार पडली.इंटकचे अध्यक्ष कैलास कदम अध्यक्षस्थानी होते.
इंटक कार्यकारिणसाठी विदर्भ,पुणे,कोल्हापूर,बीड,मुंबई,सातारा, सांगली आदी ठिकाणचे कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यकारिणीमध्ये येत्या महिनाभरात संपूर्ण महाराष्ट्रात लोक संपर्क रथयात्रा काढण्यात येणार आहे.जे २९ कामगार कायदे कामगार संघटनांनी लढून मिळविले,त्याचे केंद्र सरकारने "फोर कोड बिला"त रुपांतर करून, कामगारांना देशोधडीला लावले आहे,या बदललेल्या कामगार कायद्याला कार्यकारिणीत कडाडून विरोध करण्यात आला.या विरुद्ध कामगारांमध्ये रथयात्रेद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने अनेक उद्योगधंदे बंद करून,कंत्राटी पध्दती खूलेआम अवलंबून कामगार जीवन अस्थिर केले आहे,त्या विरुद्धही कामगार वर्गात जनआंदोलन संघटित करण्यात येणार आहे.असे अध्यक्ष कैलास कदम आणि सरचिटणीस मोहिते यांनी सांगितले.
सभेत कार्याध्यक्ष दादाराव डोंगरे, उपाध्यक्ष दिवाकर दळवी, कार्यालयीन सचिव मुकेश तिगोटे,अमित भटनागर,प्रविण वाजपेयी,श्यामराव कुळकर्णी,बजरंग चव्हाण,सुनिल वंजारी, हिंदुराव पाटील,सुनिल बोर कर,बी.के.झा,आदींनी आपल्या भाषणात या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आहे.••••••
addComments
टिप्पणी पोस्ट करा