खासदार हेमंतपाटील यांच्या प्रयत्नाने ८१ भाविक सचखंड एक्सप्रेसने ‘वृंदावन’ला रवाना

 

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने ८१भाविक अमृतसर एक्सप्रेसने ‘वृंदावन’ला रवानानांदेड, दि.२५(प्रतिनिधी) ः श्रीमद भागवत कथा सप्ताहासाठी मथुरेला जाण्याची भाविकांची मनापासूनइच्छा असतांना देखील रेल्वेचे रिझर्वेशन मिळत नसल्याने अनेक भाविकांचे मथुरेलाजाण्याचे स्वप्न भंगणार असे वाटत होते. परंतु ऐनवेळी खासदार हेमंत पाटील यांनी थेटकेंद्रीय राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क साधत भाविकांसाठीनांदेड-अमृतसर एक्सप्रेसला विशेष बोगी जोडून देण्याची मागणी केली अन् रेल्वेमंत्री यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या मागणीनुसार सिकंदराबाद रेल्वे विभागासनांदेड-अमृतसर एक्सप्रेसला विशेष बोगी जोडून देण्याच्या सूचना केल्या. त्यामुळेमथुरेला जाणाऱ्या भाविकांचा मार्ग मोकळा झाला. खासदार हेमंत पाटील यांच्याप्रयत्नामुळे आम्हाला श्रीमद भागवत कथा सप्ताहासाठी मथुरेला जाता येत असल्यानेभाविकांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले.                       मथुरा येथे गुरूवार(दि.२६) पासून सुरू होत असलेल्या श्रीमद भागवत कथा सप्ताहासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हदगाव - हिमायतनगरतालुक्यातील ८१ भाविक जाणार  होते परंतुत्यांना रेल्वेचे आरक्षण मिळत नाही. याबाबत भाविक लक्ष्मण कदम, नरसिंगमहाराज केरूरकर आणि मनोहर पांचाळ यांनी खासदार हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधलाआणि खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे , उत्तर रेल्वे विभाग फेरोजपुर ,दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद आणि नांदेडयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अखेर नांदेड-अमृतसर एक्सप्रेस ला विशेषबोगी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याने मंगळवारी (दि.२५) नांदेड-अमृतसरएक्सप्रेस रेल्वेने मथुरेकडे रवाना झाले. गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटीलयांनी हुजुर साहेब नांदेड रेल्वे स्थानकावर जाऊन या ८१ भाविकांची भेट घेतली.प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासाठी जेवणाचे पॅकेट तयारकरून त्यांना जेवण दिले. चहा, नाष्टा, केळी अशी फराळाची देखील व्यवस्था करून त्यांनापुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. हिंगोलीलोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील सध्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुंबईत असल्याने त्यांच्या अनुपस्थितित त्यांच्यासुविद्य पत्नी राजश्री पाटील ह्या भाविकांना प्रवासासाठी शुभेच्छा देण्यासाठीरेल्वे स्थानकावर उपस्थित राहिल्याने मथुरेला जाणाऱ्या भाविकाचा आनंद व्दिगुणीत झाल्याचेत्यांच्या चेहर्‍यावरून स्पष्ट दिसत होते. राजश्री पाटील यांनी अगदी प्रत्येकभाविकांची अस्थेवाईकपणे विचारपूस करत, प्रवासादरम्यान कुठलीही अचडण आल्यास आम्हाला थेट संपर्क करा खासदार हेमंत पाटील आपल्यामदतीस तत्पर असतील असे विश्वास दिला. त्यानंतर भाविकांच्या वतीने देखील राजश्री पाटील यांचे स्वागत करून खासदार हेमंतपाटील व त्यांच्या टिमचे आभार मानले.  

टिप्पण्या