नांदेड : स्थानिक गुन्हे शाखेत कोणाची वर्णी लागेल हे शेवटच्या क्षणापर्यंत निश्चित झाले नव्हते.
मंगळवारी दुपारी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलेल्या
आदेशानुसार ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार हे
स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबीच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत.
भंडरवार यांनी तात्काळ आपला पदभार स्वीकारला आहे. स्थानिक गुन्हे
शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर
त्यांच्या ठिकाणी कोणाची वर्णी लागेल याची चर्चा संबंध जिल्ह्याभर सुरू
होती. काही जणांनी या पदासाठी वशिलेबाजीही लावली होती मात्र भंडरवार यांनी अनुभव आणि
कामाच्या बळावर बाजी मारली.
addComments
टिप्पणी पोस्ट करा