यशवंत ' मध्ये भारतीय संस्कृत भाषेतील महान कवी कालिदासांवर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार संपन्न*



नांदेड:(दि.३० ऑक्टोबर २०२३)       श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील इंग्रजी विभागामार्फत संस्कृत भाषेतील महान कवी कालिदासांवर एक दिवशीय राष्ट्रीय वेबिनारचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दि.२८ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले होते. 

          भारतीय ज्ञान व्यवस्थेअंतर्गत 'महाकवी कालिदास यांचे वाङमय' या विषयावर एक दिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. 

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे हे होते तर प्रमुख वक्ते आंतरराष्ट्रीय अध्यात्मिक अभ्यास केंद्र अमृतदृशनम बेंगुलूर, कॅम्पसचे केंद्र समन्वयक डॉ. मनीष राजन वाळवेकर हे होते. 

          प्रारंभी प्रस्तावना अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका व इंग्रजी विभागप्रमुख डॉ.एल.व्ही.पद्माराणी राव यांनी केली तर सूत्रसंचालन प्रा.माधव दूधाटे यांनी केले.

          डॉ.मनीष वाळवेकर ह्यांनी महाकवि कालिदास यांच्या वाङ्गमयाच्या अनेक पैलूंवर विस्तृतपणे मार्गदर्शन केले.

          या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते होते.

          कार्यक्रमाच्या शेवटी आभार डॉ.रत्नमाला मस्के यांनी मानले. या वेबिनारच्या यशस्वीतेसाठी प्रा.नितीन नाईक, डॉ.अजय टेंगसे, डॉ. कैलास इंगोले, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, विठ्ठल सुरनर, राजू अडबलवार, डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज