मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी
ओबीसी जातनिहाय जनगणना पूर्ण करून बिहार सरकार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी धाडसाचे काम केले आहे,त्याबद्दल ओबीसी समाजाकडून त्यांचे अभिनंदन. त्याचबरोबर महाराष्ट्राने बिहार सरकारचे अनुकरण करून ओबीसी जातनिहाय जनगणना पूर्ण करावी अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते व काँग्रेस प्रदेश सचिव श्रावण रॅपणवाड यांनी दिली आहे.
बिहार सरकारने ओबीसी जातनिहाय जनगणना करून आकडेवारी जाहीर करण्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते श्रावण रॅपनवाड यांनी म्हटले आहे की,देशभर विविध राज्यात आरक्षणाची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बिहार सरकार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ओबीसी जातनिहाय जनगणना करणारे पहिले राज्य बनवले आहे. बिहार सरकारने राज्यपातळीवर ओबीसी जातनिहाय जनगणना करून सदर आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे ओबीसींचे सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक व राजकीय परिस्थितीचे आकलन स्पष्टपणे झाले आहे. त्यात मागास ओबीसी आणि अति मागास ओबीसी ची आकडेवारी पुढे आली आहे.घोषित केल्याप्रमाणे नितीश कुमार सरकारने अवघ्या काही महिन्यात सदर ओबीसी जातनिहाय जनगणना करून देशातील बहुसंख्य ओबीसींना दिलासादायक मार्ग दाखवला आहे. त्याबद्दल नीतीश कुमार सरकारतील सर्व मंत्री व बिहार प्रशासनाचे आभार देशातील संपूर्ण ओबीसी समाज मानत आहे.
महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर बिहार सरकारचे अनुकरण करीत ओबीसींची जात निहाय जनगणना करून आकडेवारी जाहीर करायला हवी, जेणेकरून ओबीसींना योग्य न्याय देत इतर समाजांच्याही आरक्षण मागणीकडे लक्ष्य देता येईल अशी मागणी ओबीसी समन्वय समितीचे नेते तथा काँग्रेस प्रदेश सचिव श्रावण रॅपनवाड यांनी केली आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा