मेहकर:- शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य अ.नगर तर्फे प्रा वसंत गिरी यांच्या 'क्रांती उद्यानाचे तपस्वी ' या लेखसंग्रह साहित्यकृतीस संमेलनाध्यक्ष डाॅ.पुरुषोत्तम भापकर आणि खा.सुयश विखे पाटील यांच्या हस्ते २०२२ चा राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार दि.०८/१०/२३ ला अ. नगरच्या गुणे आयु्र्वेदिक महाविद्यालायातील ना धो महानोर साहित्य नगरीत प्रदान करण्यात आला.एकाच आठवड्यापूर्वी दि ०१/१०/२३ ला मेहकर येथे मे ए सो महाविद्यालयातील कवीश्रेष्ठ ना घ देशपांडे साहित्य नगरीत साहित्य जगतच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुभाषजी किन्होळकर यांच्या हस्ते त्यांना माणिकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.त्यामुळे मेहकर परिसरात सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जातआहे.त्यांच्या भावी वाटचालिस मनपूर्वक शुभेच्छा.
प्रा वसंत गिरी यांना 'शब्दगंध ' व 'माणिक रत्न ' पुरस्कार
addComments
टिप्पणी पोस्ट करा