मराठा आरक्षणासाठी श्री अशोक शंकरराव चव्हाण@AshokChavanINC Tweet


 @AshokChavanINC Tweet

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना एक महिन्याचा वेळ मागितला होता. जरांगे पाटील यांनी १० दिवस अधिक दिले होते. राज्य सरकारने मागितलेली एका महिन्याची मुदत उद्या संपते आहे. ज्याअर्थी राज्य सरकारने एक महिन्याची मुदत मागितली होती, त्याअर्थी त्यांचा रोडमॅप निश्चित असावा. त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एका महिन्यात काय घडले आणि पुढील कार्यवाही काय असेल, याबाबत स्पष्टता केली पाहिजे.

मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या भावना तीव्र आहेत. आपली दिशाभूल होते आहे, आपल्याला खोटे सांगितले जाते आहे, वेळकाढूपणा सुरू आहे, अशी भावना मराठा समाजामध्ये निर्माण होऊ लागली आहे. लोकांच्या भावनांचा राज्य सरकारने आदर केला पाहिजे. आरक्षण कसे द्यायचे, याबाबत वेगळे मतप्रवाह असू शकतात. मात्र आरक्षण मिळालेच पाहिजे, याबाबत मराठा समाजाचे एकमत आहे. त्यावर राज्य सरकार ठोस भूमिका घेईल, अशी अपेक्षा आहे.. 


माजी मुख्यमंत्री 

श्री अशोक शंकरराव चव्हाण

टिप्पण्या