नांदेडच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 4 महिन्याच्या बाळाचा मृत्यू

सतीश वाघमारे / नांदेड :

 नांदेडच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूने थैमान घातले असून आतापर्यंत 41 रुग्ण दगवल्याची भीती वर्तवली जात आहे. तर यात 22 नवजात बालकांचा समावेश असून 

यामध्ये श्रेया उत्तम काळे या चार महिन्याच्या बाळाचा शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या उपच्याराअभावी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उत्तम काळे हे मुळचे ईसरवाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद येथील असून ते मागील चार वर्षापासून नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर या ठिकाणी

 भगवान हिमगिरे यांच्याकडे सालगडयाने काम करीत असतात 

 उत्तम काळे यांना 12 वर्षानंतर पहिल्यांदाच कन्यारत्न प्राप्त झाले. त्यामुळे त्यांचा आनंद हा गगणात मावेनासा झाला. मुलीचा जन्म झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यात ती अचानकपणे आजारी पडली. त्यामुळे तिला दि. 2 ऑक्टोंबर रोजी नांदेड येथील बनाळीकर हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी निमोनियाची साथ आहे असे म्हणत 4 महिन्याच्या बाळावर उपचार सुरु

केला. दोन दिवस खाजगी रुग्णालयात या बळावरती उपचार करण्यात आला.मात्र 

काळे यांची परिस्थिती ही अतिशय नाजूक असल्यामुळे पुढील उपचार घेण्याकरता लागणारा औषधांचा खर्च व रुग्णालयाचा खर्च काळे यांना झेपत नसल्यामुळे त्यांनी बाळास नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

 मात्र या शासकीय रुग्णालयात

 औषधांचा तुटवडा असल्यामुळे काळे यांना बाहेरूनच औषधी घेऊन येण्यास डॉक्टरांनी सांगितले. असा आरोप नातेवाईकांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना केला आहे. तसेच या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची व अपुरे मनुष्य बळाची कमतरता असल्यामुळे या बाळास वेळेवर औषध उपचार व डॉक्टरांनकडून वेळेवर तपासणी न झाल्यामुळे त्यांच्या हलगर्जीपणामुळे श्रेया हीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यास जवाबदार येथील शासकीय यंत्रणा, डॉक्टर, नर्स, हेच आहेत असा आरोप मयत श्रेयाच्या आईने व नातेवाईकांनी केला आहे.

टिप्पण्या