रानडुकराच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसास 20 लाख रुपयाची मदत.

 



      राम दातीर 

माहूर ( प्रतिनिधी )माहूर वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या नियतक्षेत्र तांदळा अंतर्गत मच्छिंद्र पारडी या गावामध्ये वन्यप्राणी रानडुकराच्या धडकेत शेतात काम करणाऱ्या लक्ष्मीबाई राजेंद्र लाखे या महिलेचे दुखद निधन झाले होते.त्यानुसार उपवन संरक्षक नांदेड व सहाय्यक वनसंरक्षक किनवट यांचे मार्गदर्शनात वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी कार्यालयीन प्रक्रिया पार पाडून वेळेत मदत मिळवून दिल्या बद्दल मयत महिलेच्या वारसाने त्यांचे ऋण व्यक्त केले आहे.

      दि.1 ऑक्टो.ते 7 ऑक्टो. या कालावधीत वनमहोत्सव साजरा केल्या जातो. त्याच दरम्यान दि.4ऑक्टो.रोजी माहूर कार्यालयात सदरचा धनादेश मयत महिलेच्या वारसास सुपूर्द करण्यात आला.

     वनपरिक्षेत्र माहूर हे घनदाट जंगलाचा भाग आहे,येथे बिबट, अस्वल, रानडुक्कर इत्यादी हिंस्र श्वापदे असून उपवनसंरक्षक व सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखालीवनविभागाकडून मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी नेहमीच सकारात्मक पावले उचलली जातात.अशी प्रतिक्रिया रोहित जाधव यांनी दिली आहे.

टिप्पण्या