पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वांगिण विकास मंडळ लातूरची नूतन कार्यकारिणी जाहीर
लातूर : प्रतिनिधी 
महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी स्थापन होऊन सातत्याने कार्यरत असणाºया प्रतिष्ठीत मंडळांपैकी एक असलेल्या लातूरच्या पुण्यश्लो अहिल्यादेवी सर्वागिण विकास मंडळाची निवडणुक अत्यंत खेळीमेळीच्या आणि सामोपचारातून पार पडून २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची बिनविरोधी निवड करण्यात आली़ नूतन कार्यकारिणी  पुढील प्रमाणे आहे़ 
अध्यक्ष अ‍ॅड़ मा़ गो़ मांडूरके, उपाध्यक्ष डॉ़ एस़ बी़ सलगर, सचिव अ‍ॅड़ मंचकराव ढोणे, कोषाध्यक्ष बाळकृष्ण धायगुडे, कार्यकारिणी सदस्य संभाजीराव सुळ, रामकिशन मदने, उद्धव दुधाळे, सुरेश अभंगे, सुभाष लवटे, संभाजी बैकरे, राम पाटील, दगडू हजारे, राजेश बनसोडे, मनोज राजे, राम रोडे, सुजितकुमार वाघे, राजाभाऊ मदने, सिद्धेश्वर धायगुडे, जीवन करडे, संपत गंगथडे, नवनाथ कवितके यांचा समावेश आहे़ कार्यकारिणीची बिनविरोधी निवड होण्यासाठी संभाजी सुळ, रामकिशन मदने, भारत खंदारे, राजपाल भंडे, निर्भय कोरे, बालाजी पांढरे, अ‍ॅड़ बाबुराव बंडगर, गोविंद सुरवसे, गोपाळ सूरवसे, वैश्यपायन जागले, हणमंत पाटील, भारत माने आदींनी विशेष सहकार्य केले़ निवडणुक निर्णय अधिकारी अ‍ॅड़ शेखर हविले यांनी काम पाहिले़
हे मंडळ गेल्या दोन दशकांपासून समाजाच्या उत्थानासाठी कार्यरत असून राज्यस्तरी धनगर समाज वधू-वर परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपन, अशा अनेक समाजोपयोगी कार्यात अग्रेसर असल्यामुळे महाराष्ट्राबरोबरच राज्याबाहेरही या मंडळाचे मोठे संघटन आहे़ आगामी काळात धनगर समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांचे मोफत मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचा मानस असून त्यासाठी समाजाच्या वतीने एक मोठी वास्तू उभारण्याचा संकल्प नुतन कार्याकारिणीचे केला आहे़

 





टिप्पण्या