नायगाव प्रतिनिधी /
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या तसेच अल्पसंख्यांक समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढा देणारी सामाजिक संघटना ऑल इंडिया तन्जीम -ए- इन्साफ च्या नायगाव तालुक्यासह नरसी शहराच्याही प्रभारी पद नुकताच जाहीर करण्यात आला असून यात नरसी प्रभारी पदी सद्दाम पटेल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
ही निवड इन्साफचे जिल्हाध्यक्ष अब्दुल बशीर माजीद यांच्या अध्यक्षतेखाली व इन्साफचे जिल्हा उपाध्यक्ष जुबेर खान,मोईन कुरेशी,आमेर अरसिल, नांदेड शहराध्यक्ष शाहेद उल इस्लाम, जिल्हा सो मिडिया अध्यक्ष मुस्तफा पिंजारी बेटमोगरेकर,देगलूर तालुका प्रभारी असलम शेख, नवनिर्वाचित नायगाव तालुकाध्यक्ष आरिफ शेख,सचिव शेख मोहियोदीन, ता.उपाध्यक्ष शेख आजम, शहराध्यक्ष शेख अजीज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नरसी शहरासह नायगाव तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे आणि सामाजिक कार्यातून आपली ओळख निर्माण करणारे सद्दाम पटेल यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन दि.६ जून रोजी त्यांची ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ च्या नरसी प्रभारी पदी निवड करण्यात आली आहे.
या निवडी प्रसंगी जेष्ठ पत्रकार मतीन मुदखेडकर,शादुल कुंचेलीकर,रफिक पठाण,शेख सत्तार,बाबाभाई,पत्रकार अहेमद शेख,शेख आसीफ,शेख लतीफ,मो.गौस,शेख फेरोज,जीलानी इमामसाब,अ.वाहेद,शेख फाजील,जकी पठाण,शेख वाहेद,अ.साजीद,मुद्दसीर,आफताब,आलताफ आदी उपस्थित होते तर प्रास्ताविक पत्रकार शेख अजिम नरसीकर तर आभार असलम शेख यांनी मानले

COMMENTS