संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी केज पोलिसांनी केली १३ जणांवर कार्यवाही


संचारबंदीचा आदेश डावलून आदेशाचा भंग : केज पोलिसांची १३ व्यावसायिकांना विरुद्ध कार्यवाही

मस्साजोग प्रतिनिधी :-अनंत जाधव

 संपूर्ण राज्यात रात्री ८:०० ते सकाळी ७:०० वा. पर्यंत संचार बंदीचा आदेश असतानाही केज पोलीस स्टेशन हद्दीतील काही व्यावसायिकांनी आदेश डावलून दुकाने व व्यवसाय सुरू ठेवला अशा १३ जणांवर केज पोलिसांनी कार्यवाही केली आहे.

या बाबतची माहिती अशी की, राज्यात शुक्रवार ते सोमवार या दिवशी दिवसा सकाळी ७:०० ते रात्री ८:०० वा. पर्यंत जमावबंदी आणि रात्री ८:०० ते सकाळी ७:०० वा. पर्यंत संचारबंदी व विक एन्डला म्हणजे शुक्रवारी रात्री ८:०० ते सोमवार सकाळी ७:०० वा. पर्यंत पूर्णतः लॉक डाऊनचा आदेश आहे.

दि. ५ एप्रिल रोजी रात्री ८:०० वाजल्या नंतरही केज पोलीस स्टेशन हद्दीतील १)सय्यद ईर्शाद अली, वय २९ वर्ष रा. अजिजपुरा यांंचे महाराष्ट्र चायनिज चिकन हॉटेल, २) किरण राजाभाऊ खडके, वय २२ वर्ष रा. प्रशांतनगर यांचे तुळजाई ॲटो गॅरेज बीड रोड, ३) बाबासाहेब मोहनराव यादव, वय ४३ वर्ष रा. उमरी याचे वृंदावन हॉटेल बीड रोड, ४) शेख फुरखान मुस्ताक, वय ३२ वर्ष रा. रोजा मोहल्ला मुळ गाव मोमीन गल्ली धारुर याचे हॉटेल येरमाळा मच्छी, ५) सलमान अल्लबक्श शेख, वय २५ वर्ष रा. कोरेगाव यांचे  हॉटेल जय हिंद, ६) सुरेश कुमार मंगीलाल जाट, वय ३२ वर्ष रा. गोपाळपुरा कला राज्य राजस्थान यांचे भरकादेवी आईस्क्रीम, मस्साजोग बस स्टँड, ७) अशोक काशिनाथ गायकवाड, वय ३५ वर्ष रा. मस्साजोग यांचे शिवनेरी पान सेंटर, ८) लहु बाबासाहेब चौरे, वय २२ वर्ष रा. बेलगाव यांचे मोरया गॅरेज, ९) मनोज रामराव सुर्यवंशी, वय २८ वर्ष रा. पिसेगाव यांचे हॉटेल कन्हैय्या, १०) अरुण दयावान चाटे, वय ५० वर्ष रा. तांबवा यांचे हॉटेल रेणुका पिसेगाव फाटा, ११) मिनाज कुरेशी शब्बीर कुरेशी, वय २० वर्ष रा. रोजा मोहल्ला गल्ली केज यांचे शालीमार बिर्याणी हॉटेल, १३) शेख महेबुब शेख गुलाब, वय १९ वर्ष रा . साळेगाव यांचे पान स्टॉल आणि १३) किशनलाल मोतीजीलाल गाडरी, वय २८ वर्ष, रा. साळेगाव, मूळ गाव राजस्थान यांचे भैरवनाथ आईस्क्रीम गाडा साळेगाव या तेरा जणांवर पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशाने पोलिसांनी दंडात्मक कार्यवाही केली आहे.

टिप्पण्या
Popular posts
मुंबई पोर्ट ट्रस्टमधून सामाजिक व राजकीय कार्यकर्ते राजेंद्र खोपडे सेवानिवृत्त*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील आदर्श कामगार कार्यकर्ते विजय चोरगे सेवानिवृत्त*
इमेज
माहूरचे वन परीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी केलेल्या बोगस कामाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करा
इमेज
शैक्षणिक साहित्यांनी महामानवाला अभिवादन करावे एक वही एक पेन अभियानचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र
इमेज
*वीरशैव लिंगायत समाजाने संघटित झाल्याशिवाय प्रगती शक्य नाही* - रामदास पाटील सुमठाणकर यांचे कपिलाधार धर्मसभेत आवाहन.
इमेज