माजलगाव/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाअध्यक्ष उमेशकुमार जेथलिया यांना आदर्श पत्रकार समिती केजचा निर्भीड पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
माजलगाव तालुक्यासह जिल्हाभरात चुकला तो ठोकला ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून प्रशासन व लोकप्रतिनिधी वर आपल्या लेखणीचा धाक निर्माण करणारे पत्रकार म्हणून उमेश जेथलिया यांची ओळख आहे.लो टिळक,अत्रे,बाळ ठाकरे,खाडिलकर ,गंमत भंडारी यांच्या पठडीतील लेखन शैली हे जेथलिया यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य आहे.मराठी भाषेवर त्याचें असणारे प्रभुत्व त्यांच्या लिखाणास झळाळी देतात.2002 पासून सामाजिक राजकीय विषयावर लेखन करणारे मुक्त पत्रकार जेथलिया 2009 पासून सक्रिय पत्रकार म्हणून काम करू लागले.फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या पत्रकारितेस एक तप पूर्ण होत असून तपपूर्ती व पुरस्कार प्राप्ती चा दुग्धशर्करा योग या वर्षी आला आहे.आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम ते नेहमीच करतात.लोकडाऊन मध्ये रक्तदान शिबीर, पोलीस प्रशासनास स्वखर्चाने चहा पाणीच्या व्यवस्था,पत्रकार व पेपर वाटप करणारे मुलं यांना आर्सेनिक अल्बम च्या औषधांचे वाटप त्यांनी पत्रकार संघाचा माध्यमातून राबवले.बाहेरगावी अडकलेल्या शेकडो युवक युवतींना प्रशासनाचा दुवा बनून त्यांनी कोव्हिडं काळात सहकार्य केले.त्यांच्या कार्याची दखल केज च्या आदर्श पत्रकार समितीने स्वतःहून घेतली हे विशेष.त्यांच्या निर्भीड पत्रकारितेला सलाम करणारा निर्भीड पत्रकारिता पुरस्कार काल जाहीर करण्यात आला.31 जानेवारी रोजी केज येथे मोठ्या थाटामाटात या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

COMMENTS