बाळासाहेब ..
थिटी पडे तलवार
अशी वाणीला धार
मुठ विचारांची घट्ट
लढवय्या ते सरदार
कुणाचे का उपकार
न ठेवी काही उधार
देताना दीन दुबळ्या
तेवढाचं कर्ण उदार
जसे मनी सुविचार
तसाचं सदैव आचार
आठवणींनी तयाच्या
होती सहज संस्कार
देता मराठी आकार
प्रगतविचार स्विकार
वाणीत सूर्याचे तेज
तरी नव्हता विखार
प्रयास करती अपार
सेतुबंधनी जशीखार
वयाचे तुटले बंधन
कर्मयोगी सदा तयार
मिळे कधी तुरे हार
कधी कधी होय हार
रपेट प्रगती मार्गावर
घटृ मांड घोडे स्वार
पाहता चित्र तस्वीर
सळ सळते रूधीर
विरोधकांचेही कसे
अलगद झुकते शीर
- हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६.
www.kavyakusum.com
२)
बाळासाहेब ..
होती बहू सत्रा साठ
एकचि हृदय सम्राट
सह्याद्री परी सदैव
कणा तयाचा ताठ
थोडी आगळी होती
त्याने दावलेली वाट
शेवटी नक्की पहाट
तिष्ठत पहात वाट
धाडस तया विराट
भाषा ती खडाखाट
नावाडे तया हुजूरी
मिळमिळीत ते भाट
पोही प्रवाहा विरोधी
विद्रोही जबरी लाट
देश प्रेम ओसंडूनि
वाहते ते काठोकाठ
त्यांच्यामुळे लाभला
मराठीला असा थाट
भगव्यामिळे सन्मान
असा दिव्य थरथराट
- हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६.
www.kavyakusum.com
३)
बाळासाहेब
हिंदु हृदय सम्राट
आगळे व्यक्तीमत्व
सह्याद्रीहून बलाढ्य
वेगळे असे कर्तृत्व
हृदयी थेट पोचायचे
अभ्यासपूर्ण वक्तृत्व
संग्रही राहो भाषणे
असले अपूर्व महत्त्व
भासत राही उणीव
असे ना दुजे नेतृत्व
नीरक्षीर भावनेचे ते
झणझणीत हिंदुत्व
समर्थ व्यंगचित्रकार
मार्मिक थेट कवित्व
रोखठोक भाषाअसे
स्विकारे सर्वदायित्व
असा नेता विरळाचं
कधी न सोडले तत्व
आठव येत राहे नीत
कधी न तोडले सत्व
- हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६.
www.kavyakusum.com


COMMENTS