शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास सुरुवात



जाहूर ता.मुखेड (बालाजी पाटील) :-

                                  शेतकरी अर्थ सहाय्य अनुदान वाटपाचे काम अंबुलगा बु ता मुखेड येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतून चालू झाले असुन सुरुवात उंद्री(प.दे) या गावापासून झाली आहे.दर वेळेस A या गावापासून अनुदान सुरुवात केले जात होते.तर या वेळेस Z पासून सुरुवात करण्यात आली आहे.या बँकेला २० गावी जोडली असुन १५ हजार खाते आहेत.यंदाच्या पावसाळी सत्रा नंतर परतीच्या पावसाने शेतातील उभ्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला सर्व प्रकारच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले.महसूल व क्रषी खात्यांचे पथक प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामा केला.या अहवालानुसार शेतकरी बांधवांनासरकारने हेक्टरी अर्थसहाय्य जाहीर केले.त्या मदतीचा ५० टक्के पहिला हप्ता देण्यात येत आहे.अंबुलगा बु.ता मुखेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ता.२३ डिसेंबर पासून अनुदान देण्यास उंद्री(प.दे) या गावापासून सुरुवात केली आहे.शाखेने दररोज दोनशे शेतकऱ्यांना अनुदान वाटप करत आहे.गर्दी व गोंधळ होऊन बँकेचे व्यवहार विस्कळीत होऊ नये यासाठी दररोज दोनशे शेतकऱ्यांना अनुदान वाटप एकदम शांततेत करण्यात येत आहे.बँकेतील सर्व कर्मचारी कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी बारकाईने लक्ष देत आहेत.

टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज
*अन्याया विरूद्ध संघटीत व्हा! सचिन अहिर यांचे कामगार दिनानिमित्त कामगारांना आवाहन*
इमेज