सोनपेठ/प्रतिनिधी सोनपेठ तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून गौण खनिज उत्खनन चालू आहे.यात मुरूम दगड मोठ्या प्रमाणात काढून ते विक्री करून त्यातून...
सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून गौण खनिज उत्खनन चालू आहे.यात मुरूम दगड मोठ्या प्रमाणात काढून ते विक्री करून त्यातून माफियांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी वाढवली होती.खडका परिसरात वाळूमाफियांचे ठाण असून याला राजकीय पार्श्वभूमीभूमीची किनार लागलेली आहे.यातच २५ डिसेंबर रोजी खडका शिवारात शेतमालक सारला व सुनील सुरेशराव यादव यांच्या शेतात अवैध मुरुमाचे उत्खनन चालू असल्याची माहिती सोनपेठचे कर्तव्यदक्ष तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार व पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने यांना मिळताच त्यांनी धडक कार्यवाही करत जेसीबी क्र.एम.एच.२२एन.४५७७ ही ताब्यात घेऊन पोलीस कार्यवाहीची प्रक्रिया राबवली आहे.बिरादार यांनी कोणालाही पाठीशी घालणार नसून धडक कार्यवाही करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

COMMENTS