तलवारीचा धाक दाखवून आयचर टेम्पो लुटून पावणेपाच लाख रु. लुटणा-या टोळीस कुंटुर पोलिसानी केले अटक कुंटुर पोलिसांचे सर्वत्र कौतुक

नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) आयचर टेम्पो चा मोटार सायकलने पाठलाग करुन तलवारीचा धाक दाखवुन कॅबिन मध्ये जावुन टेम्पो मध्ये घुसून...

नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )

आयचर टेम्पो चा मोटार सायकलने पाठलाग करुन तलवारीचा धाक दाखवुन कॅबिन मध्ये जावुन टेम्पो मध्ये घुसून नगदी रक्कम 4,95,000/- (अक्षरी – चार लाख पंनच्यानो हजार ) रुपये बळजबरीने हिसकावुन घेवुन पळून गेलेल्या आरोपीतांना कुंटुर पोलिसांनी 36 तासात अटक केल्याची घटना घडली आहे. या धाडसी कृत्याबद्दल कुंटुर पोलिसांचे सर्वत्र कोतुक आहे.

या बाबद अधिक वृत्त असे की फिर्यादी शेख असीफ अली शेख मुनवर अली वय 33 वर्ष व्यवसाय – अंडा व्यापारी (अली अॅग्रो फॉरमींग सिध्दीपेठ) रा.12-1-58 गणेश नगर सिध्दीपेठ ता. जि.सिध्दीपेठ राज्य – तेलगंणा याचे कंपनीतील आयचर टेम्पो क्र.TS-16 -UC-2343 चे ड्रायव्हर मिझा अफझल बेग व महमद जमील यांनी अकोला येथे अंडे विक्री करुन विक्री केलेल्या अंडयाचे रक्कम 4,95,000/- (अक्षरी चार लाख पंनच्यानो हजार ) रुपये घेवून परत सिध्दीपेठ कडे येत असतांना नांदेड ते नायगांव जाणारे रोडवर मौ.देगाव फाटा येथे दि.15/12/2020 रोजी सकाळी अंदाजे वेळ 04.10 वाजताचे सुमारास आले असता अज्ञात तिन इसमांनी मोटार सायकल वर पाठलाग करुन आयचर टेम्पो थांबवुन तलवारीचा धाक दाखवुन आयचर टेम्पो च्या कॅबिनमध्ये घुसून जिवे मारण्याची धमकी दिली. किन्नर साईडच्या पाठीमागील सिट खाली ठेवलेले पैशाचे बंडल रक्कम 4,95,000/- (अक्षरी – चार लाख पंनच्यानव हजार) रुपये जबरीने घेवुन आयचर टेम्पोच्या काचेवर तलवारीने मारुन काच फोडुन नुकसान करुन पळुन गेले .अशी फिर्याद दिली.

मजकुराचे जबाबावरुन पो.स्टे ला गु.र.नं. 213/2020 कलम 392,427,506, 34 भा.दं.वि. सह कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा 1959 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला .

सदरचा गुन्हा दाखल होताच गुन्हयाचे तपासीक अधिकारी, के.एस.पठाण, सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस स्टेशन कुंटुर यांनी .प्रमोद शेवाळे, पोलीस अधिक्षक नांदेड, निलेश मोरे, अप्पर पोलीस अधिक्षक नांदेड, डॉ.सिध्देश्वर धुमाळ, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग बिलोली, द्वारकादास चिखलीकर, पोलीस निरिक्षक, स्थानिक गुन्हे शाखा नादेड यांचे मार्गदर्शनात तपासाची चक्रे फिरवुन गुन्हयातील अज्ञात आरोपीतांनी केलेल्या गुन्हयाच्या पध्दतीचा अभ्यास केला व सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध मोहीम ला सुरुवात केली.

आरोपी नामे 1) शेख जैनुद्दीन शेख दस्तगीर वय 32 वर्ष व्यवसाय – ड्रायव्हर रा.साई नगर, इतवारा नांदेड ता.जि.नांदेड 2) शेख जफर शेख जमील वय 25 वर्ष व्यवसाय – व्यापार रा.साने हॉस्पीटल जवळ, झाकीर हुसैन नगर परभणी ता. जि.परभणी 3) अकबर वलीयोद्दीन इनामदार वय 26 वर्ष व्यवसाय – क्लिनर रा.दर्गा रोड, एक मिनार मस्जीद परभणी ता.जि.परभणी हे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन गुन्हा उघडकीस आणला व सदर गुन्हयातील आरोपीतांकडुन गुन्हयातील गेला माल रक्कम 4,74,300/- (अक्षरी चार लाख चौ-याहत्तर हजार तिनशे ) रुपये व गुन्हयात आरोपीतांनी वापरलेली तलवार, मोटार सायकल क्र.MH-22-AR-7776 हे त्यांचे राहते घरुन जप्त करुन सदर गुन्हयात आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.

सदरची यशस्वी कार्यवाही के.एस.पठाण,सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस स्टेशन कुंट्रर यांचे सोबत पोना/94 शेख अब्दुल बारी, पोको/2378 शंकर बुध्देवाड पोकॉ/2668 अशोक घुमे, |वैक 1874 विवेक ईश्वर , पोकॉ/2550 अभिजीत पाटील यांनी पार पाडली आहे. 

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content