केंद्र सरकारच्या निषेधार्थ वयाच्या 80 व्या वर्षी लक्ष्मण रुपनर करणार उपोषण शुक्रवारी माजी सैनिक लक्ष्मण रुपनर यांचे शेतक-यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषण

पिंपरी (दि. 26 डिसेंबर 2020) मागील तीस दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी माजी सैनिक ...


पिंपरी (दि. 26 डिसेंबर 2020) मागील तीस दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी माजी सैनिक व पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर हे वयाच्या 80 व्या वर्षी शुक्रवारी (दि. 1 जानेवारी 2021) एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने कोरोना महामारीच्या काळात शेतक-यांचे न्याय हक्क डावलणारे आणि भांडवलदारांच्या फायद्याचे ठरतील असे शेतकरी विरोधी कायदे संसदेत चर्चेविना मंजूर केले. हे काळे कायदे मागे घ्यावे म्हणून मागील तीस दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी बंधू, भगिनी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे हे देखील जानेवारी महिण्यात दिल्लीत उपोषण करणार आहेत. सैन्यात आण्णा हजारे यांच्या बरोबरच सेवा बजावणारे पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ नागरीक लक्ष्मण रुपनर हे वयाच्या 80 व्या वर्षी शुक्रवारी 1 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात लाक्षणिक उपोषण करणार आहेत. याबाबतचे पत्र त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना दिले आहे. त्यांच्या बरोबर पोस्टातील निवृत्त कर्मचारी ज्येष्ठ नागरीक विश्वनाथ खंडाळे हे देखील उपोषणात सहभाग घेणार आहेत.

    जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. त्याला त्याच्या शेती उत्पादनांचे व श्रमाचे योग्यं मुल्य मिळाले पाहिजे तो त्याचा हक्क आहे. केंद्र सरकारने केलेल्या नविन शेती कायद्यांमुळे शेती उत्पादनांवर अवलंबून असणारी 18 कोटींहून जास्त कुटूंब बेकारीच्या खाईत लोटली जातील. अल्प भूधारक शेतकरी बेरोजगारी आणि महागाईमुळे शहरांकडे स्थलांतर करतील. त्यामुळे नागरीकरणामध्ये लक्षणीय वाढ होऊन शहरी भागातील सेवा सुविधांवर अनावश्यक ताण येईल. शहरात झोपड्या वाढतील. गुन्हेगारीत वाढ होईल. कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल. असे अनेक दृश्य व अदृश्य दूरगामी दुष्परीणाम या शेतकरी विरोधी जुलमी कायद्यांमुळे होतील. अशी भिती ज्येष्ठ माजी सैनिक लक्ष्मण रुपनर यांनी व्यक्त केली आहे. नविन जुलमी शेतकरी कायद्यांबाबत केंद्र सरकारने पुर्नविचार करावा या मागणीसाठी उपोषण करीत असल्याचे पत्र रुपनर यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

-----------------------

फोटो : डावीकडून लक्ष्मण रुपनर व विश्वनाथ खंडाळे.

-------------------

अधिक माहितीसाठी संपर्क : लक्ष्मण रुपनर -- 9765716206. 



--

Regard,

Sanket Media Solutions,

TULSHIDAS SHINDE

Shop No. 17, Sukhwani Chambers, Opp. Thyssen Krup Company, 

Pimpri Station Road, Pimpri, Pune 411018

Contact no.-9822491684, 9552530271.

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel