अन्नधान्य व किराना साहित्य वाटप करुन किल्लेधारूर येथे टिपु सुल्तान जयंती साजरी 


 


      किल्ले धारूर /जगदीश गोरे


 


 धारूर शहरामध्ये प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी भारत देशाचे पहिले स्वातंत्र्यसेनानी टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमीत्त किल्ले धारूर जयंती उत्सव समिती तर्फे सर्व धर्माच्या गोरगरिबांना अन्नधान्य व किराना साहित्य वाटप करण्यात आले ,


    प्रतिवर्षी टिपू सुलतान जयंती निमीत्त व्याख्यान व विविध समाज उपयोगी उपक्रमासह व इतर सामाजिक कार्यक्रम घेऊन जयंती साजरी केली जाते. या वर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्याने या वर्षी जयंती निमीत्त ऑनलाइन पध्दतीने व्याख्यान व अन्नधान्य व किराणा साहित्य वाटप करुण जयंती साजरी करण्यात आली, सदर अन्नधान्य व किराणा साहित्य वाटप टिपू सुलतान जयंती उत्सव समितीचे सदस्य सादिक ईनामदार, अॅड. सय्यद साजेद, नदीम मोमीनअकरम जरगर, सय्यद रज्जाक, अकरम भाऊ, शेख सिद्दिक, शेख मोबीन, मुनीर सय्यद, अॅड. शादाब, शहबाज पठाण, इम्रान कादरी, सोहेल जरगर, गुलशन काजी,ओसामा जरगर, अजहर काजी, मुखीद जरगर, फारोख बागवान, फारोख जरगर, शेख ऐजाज, पठान अजहर, व धारूर शहरातील सर्व टिपु सुल्तान जयंती समितीचे सदस्य उपस्थित होते..



टिप्पण्या