*त्या कुटुंबाला धनादेशाचे वितरण

*


सोनपेठ/प्रतिनिधी


तालुक्यात मागील २२ ऑक्टोंबर रोजी अवकाळी पावसात पडणाऱ्या विजेच्या धक्क्याने कान्हेगाव येथील एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.मात्र नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचा निधी उपलब्ध नसल्याने सदरील बालकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली नव्हती सदर घटनेस अनुसरून युवासेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांनी सदर मयताच्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी राज्य पातळीपर्यंत केली होती या मागणीची दखल घेऊन मदत व पुनर्वसन विभागाचे मुख्य सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी सदर धनादेशाचे वितरण करण्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देईल असे आश्वासन या निवेदनात दिले होते.तसेच परभणी जिल्ह्यात २५ जनावरे व ५ मयतांच्या कुटुंबीयांना मदत करणे बाकी असल्याचेही तोंडी उत्तर दिले होते.सदरचा निधी प्राप्त होण्यासाठी सोनपेठचे तहसीलदार डॉ.आशिष कुमार बिरादार यांनीही प्रयत्न केल्याने सदर निधीचे वितरण नुकतेच बिरादार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रामेश्वर मोकाशे यांच्यासह तहसील प्रशासनाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या