◼️विनम्र_श्रद्धांजली  देवदत्ता_रे🔴

विनम्र_श्रद्धांजली 


#देवदत्ता_रे


 


कोरोनाविरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या पश्चिम बंगालमधील महिला अधिकाऱ्याचा कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. देवदत्ता रे असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. हुगली जिल्ह्यातील चंदननगर उपविभागात #उपदंडाधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांच्या मागे #पती आणि #चार_महिन्यांचा मुलगा आहे.


३८ वर्षीय देवदत्ता रे यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर घरातच क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं होतं. रविवारी त्यांची प्रकृती ढासळली असता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी कोरोनाविरोधातील लढाईत त्यांना अपय़श आलं आणि निधन झालं.


देवदत्ता रे यांच्यावर ट्रेनमधून बंगालमध्ये परतणाऱ्या #परप्रांतीय_मजुरांची जबाबदारी होती. बंगालमध्ये पोहोचल्यावर त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. माणुसकी आणि संवेदनशीलता दाखवत ज्या पद्धतीने त्यांनी परिस्थिती हाताळली होती त्याचं सर्वांकडून कौतुक केलं जात होतं. अशातच त्यांची जीवनज्योत मालवली !


 


सौजन्य सहशिक्षक शेळगे संजय 


टिप्पण्या