राजकारणातले हेडमास्तर  शंकररावजी चव्हाण

राजकारणातले हेडमास्तर


शंकररावजी चव्हाण


 


 मराठवाड्याचे सुपत्र, आधुनिक भगिरथ, राज्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी गृहमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री डॉ. शंकररावजी चव्हाण साहेब यांची जन्मशताब्दी वर्ष विविधविधायक आणि वैचारिक कार्यक्रमांनी साजरे झाले.


 डॉ. शंकररावचव्हाण साहेबांचा शेतकरी कुटूंबात पैठण येथे जन्म झाला. 


 कुटुंबात कुठलाही राजकीय वारसा नसताना शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या शंकररावजींची राजकीय कारकीर्द सदैव चढती राहिली़ आहे. 


प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया विद्यापिठातून ते बी.ए., एल् .एल्. बी. झाले. 1945 मध्ये त्यांनी वकिलाची सनद मिळवली. पण रामानंदतीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. पुसद तालुक्यातील उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद होते. 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले. राज्याचे पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंटयात त्यांची भूमिका मोलाची राहिली आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांमुळे मराठवाडयाचा विकास झाला. जायकवाडी धरण हे शंकररावजीं यांच्याच प्रयत्नांचे मोठे फळ आहे. नांदेडच्या विष्णुपुरीधरणामुळे हा भाग सुजलाम सुफलाम झालाआहे.


 राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी २१ फेब्रुवारी १९७५ रोजी शपथ घेतली़ त्यांच्या रुपाने मराठवाड्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद मिळाले़ १९७५ ते ७७ तसेच १९८६ ते ८८ असे दोन वेळा ते मुख्यमंत्री झाले़ त्यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या राजकीय व सामाजिक विचारांचा प्रभाव होता. मुख्यमंत्री, गृहमंत्रीपदापर्यंत काम केलेल्या डॉ. शंकरराव चव्हाण हे राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद आणि विधानसभा अशा केंद्र आणि राज्यातील चारही प्रतिनिधीगृहांचे सन्माननीय सभासद राहिलेले होते. राज्याच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या शंकरराव चव्हाण यांनी शून्यातून विश्‍व निर्माण केले. कर्तव्यनिष्ठ, लोकाभिमुख, निष्कलंक चारित्र्य असलेले, दूरदृष्टी आणि विचार यांचा समन्वय साधणारे आणि घेतलेल्या कामात पूर्ण झोकून देऊन काम करणे हे त्यांचे वैशिष्ट होते. म्हणून सर्वकाळ श्रेष्ठच ठरतात. 


डॉ. शंकरराव चव्हाण यांचा ‘जलसंस्कृतीचे जनक’ असा गौरवपूर्ण उल्लेख होतो. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही त्यांची घोषणा बोधवाक्य ठरली. अनेक प्रकल्पांच्या पूर्णतेसाठी त्यांनी भगीरथ प्रयत्न केल्यामुळे त्यांचे नाव ‘आधुनिक भगीरथ’ म्हणून घेण्यात येते. तसेच सचिवालयाचे ‘मंत्रालय’ असे नामकरण शंकरराव चव्हाण यांच्याच कारकिर्दित झाले. 


शंकरराव चव्हाणहे एकदृष्टेराजकारणी होते. राजकारणातले हेडमास्तर म्हणून त्यांची ओळख आहेती रास्तच आहे.


साहेबांनी लोकांसाठी केलेलं कार्य वर्षानुवर्षे लोकांसमोर, लोकहितासाठी अजरामर राहील, हे निश्चित.


साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन....


 


प्रलोभ कुलकर्णी


नांदेड.9421819020


टिप्पण्या