डॉ देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी kovid 19 मध्ये दिलेल्या योगदानाचा. स्वतः च्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेचा त्यांनी जो विडा उचलला आहे त्यांच्या या कार्याला व त्यांच्या सहकार्यांना शुभेच्छा व सलाम. शब्दांकन : दिपक मोरताळे - जलस्वराज्य परिवार नांदेड .

कोरोना योद्धा डॉ. डी. बी. देशमुख : कोरोना सारख्या संसंर्गजन्य आजरामुळे सर्वत्र हा - - हाकार उडाला असतांना अशा कठीण प्रसंगी डॉक्टर्स, पोलीस, परिचालिका, प्रशासन ई. वर भरपूर असा ताण आलेला असतांना काही डॉक्टरांनी भीतीपोटी म्हणा किंवा या आजरापासून वाचणाऱ्या वस्तूंची उपलब्धता नसल्याकारणाने आप- आपले दवाखाने, हॉस्पिटल्स बंद ठेवले होते किंवा ते रुग्णांना दाखलच काय तर बघतच नव्हते.अशा या कठीण प्रसंगी संसर्गपासून वाचण्याची साधने - सुविधा नसतांना केवळ आणि केवळ माणुसकीच्या भावनेने तळहातावर जीव घेऊन आपल्या घर दाराची अर्थात बायको मुलांची चिंता न करता एक डॉक्टर योद्धा नांदेडच्या काना- कोपऱ्यात रुग्णसेवेसाठी मोफततपासणी व औषधोपचार करतांना दिसून येत होते . अशा या डॉक्टर योद्धाला सलाम. इंडियन रेडक्रॉस सोसायटी नांदेड व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने "डॉक्टर्स आपल्या दारी " या उपक्रमाचे प्रमुख व इंडियन रेडक्रॉस सो. नांदेड जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष डॉ. डी. बी. देशमुख हे आपल्या सहकार्यासह नांदेड शहर तसेच आसपासच्या ग्रामीण भागामध्ये मोफत वैद्यकीय शिबीरे व औषधी वाटप शिबिरांचे आयोजन करत होते. 26 एप्रिल पासून ते आज पर्यंत 24 शिबिरांचे आयोजन केल्याने जवळपास 4000 रुग्णांना त्याचा फायदा झाला. इतकेच नव्हे तर ज्या माय -माउलींना दवाखान्यात जाण्यासाठी ऑटो किंवा इतर वाहन मिळत नसतांना त्यांच्या फोन वरून आलेल्या विनंती नुसार त्यांच्या घरी जाऊन आवश्यक ती औषधी व इतर सुविधा सुद्धा त्यांनी उपलब्ध करुन दिल्या. या प्रसंगी कोणी डॉक्टर सहकारी सोबत असेल किंवा नसेल अशा प्रसंगी सुद्धा सुरवाती पासून ते शिबीर संपेपर्यंत एक हाती रुग्ण सेवेचा वसा त्यांनी निभावला. या प्रसंगी त्यांना बोलते केले असता त्यांनी अतिशय मार्मिक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या महनण्यानुसार "जमाव बंदी, संचार बंदी मुळे संसर्गजन्य रोग आटोक्यात तर येतात, त्यांचा प्रसारही थांबतो परंतु त्याच बरोबर जनतेचा आर्थिक व्यवहार सुद्धा थांबतो व आर्थिक आणीबाणीला सुरुवात होते. सरकार अन्न, वस्त्र, निवाऱ्याची व्यवस्था तर करत आहे परंतु आरोग्याचे काय ? कारण कोरोनाच्या भीती मुळे सरकारी दवाखानाच काय तर खासगी दवाखान्यात जाण्याची सुद्धा आमजनतेला भीती वाटते. हाताला काम नसल्याने औषधीला सुद्धा जवळ पैसा नसतो मग व्याधी अंगावर काढण्याशिवाय पर्यायच नसतो. अशा प्रसंगी सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता मानवाने मानवाला मदत केली पाहिजे ते आपले कर्तव्यच आहे. "असे त्यांनी प्रतिपादन केले. स्वतः च्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेचा त्यांनी जो विडा उचलला आहे त्यांच्या या कार्याला व त्यांच्या सहकार्यांना शुभेच्छा व सलाम. शब्दांकन : दिपक मोरताळे - जलस्वराज्य परिवार नांदेड .


टिप्पण्या