साहित्यिक नागेश शेवाळकर यांना 'मातृभारती राष्ट्रीय पुरस्कार'*

*साहित्यिक नागेश शेवाळकर यांना 'मातृभारती राष्ट्रीय पुरस्कार'*


पुणे:- मातृभारती इन्फोटेक या ई - साहित्य प्रकाशित करणाऱ्या संस्थेचे 'वाचक पसंती पुरस्कार २०१९' राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले असून मराठी भाषा विभागात हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक नागेश सू. शेवाळकर यांना जाहीर झाला आहे. मातृभारती या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र शर्मा आणि मराठी विभाग प्रमुख अनुजा कुलकर्णी यांनी ईमेलद्वारे या पुरस्काराची घोषणा केली आहे.


         २०१९ या वर्षी प्रकाशित झालेले साहित्य आणि त्यावर वाचकांची उमटलेली पसंतीची मोहोर या आधारे नागेश शेवाळकर यांची निवड झाली असल्याची माहिती महेंद्र शर्मा यांनी दिली आहे.


२०१७ यावर्षी शेवाळकर यांनी अहमदाबाद येथील मातृभारती ईन्फोटेक या संस्थेसाठी ई साहित्य प्रकाशित करायला सुरुवात केली. त्यांची मातृभारतीवरील साहित्य भरारी पुढीलप्रमाणे आहे :


                  *चरित्र*


१) *स्वराज्यसूर्य शिवराय* ... छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र पंचवीस भागांमध्ये प्रकाशित झाले आहे.


२) *प्रेरणादायी चरित्र* या अंतर्गत विनोबा भावे, सावित्रीबाई फुले, सावरकर, शाहू महाराज, सरदार पटेल, जिजाऊ, ग. दि. माडगूळकर, महर्षी कर्वे, बाबा आमटे आणि आगरकर ही लघु चरित्र प्रकाशित झाली आहेत.


          *पत्र लिहितो मी*


या विभागात शेवाळकर यांनी 'एक पत्र संकल्पास, हास्येश्वरास पत्र, दंगलताईस पत्र, राष्ट्रीय ध्वजाचे पत्र, ईव्हीएमचे पत्र, वाहिनीवाल्यांना पत्र, एका निर्भयाचे पत्र, पोस्टमन काकास पत्र, एक पत्र डिजिटल इंडियास, प्रिय मातेस पत्र, एक पत्र अटलजीस अशा नानाविध विषयांवर पत्रलेखन केले आहे.


           *कादंबरी विभाग*


१) मी एक अर्धवटराव! (विनोदी)


२) निघाले सासुरा ! (सामाजिक)


३) ती एक शापिता! (सामाजिक)


४) शेतकरी माझा भोळा! (सामाजिक) अशा विविध विषयांवर केलेल्या कादंबऱ्यांना वाचकांची भरपूर पसंती मिळाली आहे.


                                             *कथासंग्रह*


१) स्वर्गातील साहित्य संमेलन! (विनोदी)


२) मरण तुमचे ,सरण आमुचे! (विनोदी) 


३) आमची मिस आजी ! (बाल)


४) एक दिन औषधाविन ! (विनोदी)


                                               *लेख विभाग*


१) गणपतिबप्पा! (हिंदी)


२) मी बाप्पा बोलतोय! (मराठी)


३) सचिन (मराठी)


हे लेख प्रकाशित झाले असून वाचकांच्या पसंतीला उतरले आहेत. नागेश शेवाळकर यांचे विविध साहित्य वाचणाऱ्या वाचकांची संख्या अडीच लाखांपेक्षा अधिक आहे.एक लाखांपेक्षा अधिक वाचकांनी त्यांचे साहित्य डाऊनलोड करून घेतले आहे.


       याप्रसंगी बोलताना नागेश शेवाळकर म्हणाले की, ' हा पुरस्कार आनंददायी, स्फूर्तीदायी, चैतन्यमय असून भविष्यातील लेखनास प्रोत्साहित करणारा आहे. वाचकांच्या पसंतीला आपले साहित्य उतरणे हा फार मोठा पुरस्कार आणि आशीर्वाद असून तो मी विनम्रपणे स्वीकारत असून सर्वांना धन्यवाद देत आहे.


     या पुरस्काराबाबत नागेश शेवाळकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. - देवेंद्र भुजबळ.9869484800.


टिप्पण्या