अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ साडी का नेसतात? अनेकांच्या मनात हा प्रश्न उद्भवला असेल. जाणून घेऊया या मागची आख्यायिका.

 

श्री स्वामी समर्थ हे दत्ताचे ऐतिहासिक दृष्ट्या तिसरे अवतार मानले जाते.

अक्कलकोटचे स्वामी श्रीशैल्य येथून कर्दळी वनामध्ये गेले. तेथे त्यांनी साडेतीन वर्ष तपश्चर्या केली त्यामुळे त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले होते. एके दिवशी एक लाकूड तोडा लाकूडतोडत असताना त्याचा घाव चुकला आणि त्याची कुऱ्हाड वारुळावर पडली आणि ती कुऱ्हाड स्वामींच्या मांडीवर लागून स्वामी समाधीतून जागे झाले तेथून स्वामीं अनेक तीर्थक्षेत्रच्या ठिकाणी प्रकट झाले. मग शेवटी सोलापूर येथे स्वामी वास्तव्य करून "श्री" अक्कलकोट येथे आले.

अक्कलकोट आत त्यांचे अनेक भक्त परिवार होता. स्वामींनी अनेक चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर कृपादृष्टी केली. पीडीतांना आजारात पासून मुक्त केले. त्यांनी अनेकांना सन्मार्गाला लावले. स्वामींना जात ,पंथ ,धर्म नाही त्यांची जात सर्व संतांप्रमाणे कळवळण्याची होती. जो पण मठात समस्या घेऊन येई स्वामी त्यांची समस्या सोडावी.

      अक्ककोटचे स्वामी समर्थ साडी का परिधान करत ? या मागची आख्यायिका स्वामी साक्षात अन्नपूर्णाच होय. अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार. स्वामींनी अशाच एका प्रसंगी सर्वांना भोजन दिले. एकदा कानोळी गावातून जाताना स्वामी बरोबर श्रीपाद भट्टांसह सुमारे शंभर भक्त होते.ते

सर्वजण चालून चालून भुकेने व्याकुळ झाले. पुढे चालत गेल्यावर स्वामी एका शेतात बसले .त्या शेतकऱ्यांनी फक्त स्वामींनाच फलाहार दिला व पाणी दिले. आपले भक्त उपाशी आहे हे त्यांना वाईट वाटू लागली त्यांनी त्वरित सांगितले त्या अम्रवृक्षाखाली जा तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती ती म्हणाली, "आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती पण अजून ती आली नाही सूर्यास्त झाला तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा अशा प्रकारे स्वामी समर्थांनीच अन्नपूर्णेचे रूप धारण करून सर्व भक्तांना भोजन प्राप्त करून दिले. श्रीपाद भट यांनी आधीच ओळखले होते त्यांची तशी स्वामींवर श्रद्धा होती स्वामी अन्नपूर्णेच्या रूपात आहेत. श्रीपाद भट यांच्यासारखे एकनिष्ठ सेवक ज्यांनी प्रत्यक्ष अन्नपूर्णाच्या स्वरूपात स्वामींचे दर्शन दर्शन लाभले.

कारणास्तव स्वामी साडी परिधान करतानाचा फोटो आपल्याला दिसतो.

लेखिका 

वर्षा वासुदेव भावसार

टिप्पण्या
Popular posts
मुंबई पोर्ट ट्रस्टमधून सामाजिक व राजकीय कार्यकर्ते राजेंद्र खोपडे सेवानिवृत्त*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील आदर्श कामगार कार्यकर्ते विजय चोरगे सेवानिवृत्त*
इमेज
माहूरचे वन परीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी केलेल्या बोगस कामाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करा
इमेज
शैक्षणिक साहित्यांनी महामानवाला अभिवादन करावे एक वही एक पेन अभियानचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र
इमेज
*वीरशैव लिंगायत समाजाने संघटित झाल्याशिवाय प्रगती शक्य नाही* - रामदास पाटील सुमठाणकर यांचे कपिलाधार धर्मसभेत आवाहन.
इमेज