माहूर - किनवट व माहूर तालुक्याच्या सीमेवर दुर्गम आदिवासी भागात मोहपूर येथील शासकीय आश्रम शाळेतील स्वयंपाकी श्री फकिरा राजाराम गायकवाड यांनी शासकीय सेवेत एकतीस वर्षे पाच महिने सोळा दिवस निर्विवाद सेवा पूर्ण केली असल्यामुळे त्यांना दिनांक ३१ जुलै रोजी सेवा निवृती निश्चित झाली असल्यामुळे शाळेतील शिक्षक वृंद व परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांना दि.३० जुलै रोजी शासकीय आश्रम शाळेत सहपत्नी सन्मानित करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
तसेच सद्यस्थित शाळेतील माध्यमिक शिक्षक श्री एम.ए.खान यांना पदोन्नती द्वारे मुख्याद्यापक पदाचा पदभार मिळाल्याने त्यांचा व पदोन्नती वर नव्याने रूजू झालेले माध्यमिक शिक्षक श्री ए.आर.शिंदे सरांचा सत्कार करण्यात आला आहे.
डोंगर दरीच्या मध्यभागी निरोप व सत्कार समारंभ असल्यामुळे अनेक नातेवाईक व प्रतिष्ठित नागरिक दाखल झाले होते.
निरोप समारंभात सेवानिवृत कर्मचारी फकिरा गायकवाड व त्यांच्या पत्नी रतन गायकवाड यांच्या संयुक्त सत्कार होत असताना त्यांच्या डोळ्यांत आनंद अश्रू तरंगत होते.
या कार्यक्रमात शेतकरी नेते कॉ.शंकर सीडाम,कामगार नेते कॉ.गंगाधर गायकवाड,अधिक्षक एच.एल.राविकर,ए.एस.वानखेडे, एन.बी.पाईकराव,फकिरा खडसे,साहेबराव गजभारे, संतोष पवार, पंडीत पोतरे यांच्या सह त्यांच्या अनेक नातेवाईकांची उपस्थिती होती.
या वेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले असून गौरवपूर्ण व कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचा सन्मान केला आहे.
श्री फकिरा गायकवाड हे १६ फेब्रुवारी १९९० ला शासकीय आश्रम शाळा किनवट येथे रूजू झाले होते व पिंपळदरी ता.औंढा,केदारगुडा ता.हदगांव येथे नोकरी करून मोहपूर येथे कार्यरत होते.
ज्या तालुक्यातुन सुरवात झाली त्याच तालुक्याच्या ठिकाणी निवृत्त होत असल्याने आनंदच होत आहे असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले.निरोप समारंभात बोलताना स्वयपाकी गायकवाड यांचे बंधू कॉ.गंगाधर गायकवाड म्हणाले की,माझ्या भावाने मला १९९१ ला किनवटच्या शासकीय वस्तीगृहात प्रवेश दिला आणि एस.एफ.आय.विद्यार्थी संघटनेत काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले व आज मी नेटाने कामगार कष्टकर्यांच्या प्रश्नावर जोमाने लढतो, ते केवळ आणि केवळ स्वयंपाकी असलेल्या भावामुळेच नेतृत्व करीत असल्याचे जाहीर कार्यक्रमात मान्य केले.
या वेळी कॉ.शंकर सीडाम,मुख्याद्यापक एम.ए.खान,अधिक्षक एच.एल.राविकर,वानखेडे सर यांनी मनोगत व्यक्त केले. तर आभार श्री एन.बी.पाईकराव यांनी मानले.
------------------------------------

COMMENTS