उद्या वडवणी तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत तहसील कार्यालयाच्या मिटींग हॉलमध्ये होणार सोडत

वडवणी /जगदीश गोरे  वडवणी तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत उद्या सोमवार दि.७ रोजी त...


वडवणी /जगदीश गोरे

 वडवणी तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत उद्या सोमवार दि.७ रोजी तहसील कार्यालय वडवणी येथील मिटिंग हॉलमध्ये दुपारी ठीक ३ वाजता होणार असून याची वडवणी तालुक्यातील सर्व जनता, पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी नोंद घ्यावी असे आवाहन तहसीलदार श्रीकिशन सांगळे यांनी केले आहे. 

                याबाबत अधिक माहिती अशी की, तहसीलदार वडवणी यांनी दिलेल्या जाहीर प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, वडवणी तालुक्यातील सर्व जनतेस तसेच सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना याव्दारे सुचित करण्यात येते की, वडवणी तालुक्यातील आगामी एकूण ३५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचे सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिनांक ७ डिसेंबर २०२० सोमवार रोजी तहसील कार्यालय वडवणी येथील मिटींग हॉलमध्ये दुपारी ठीक ३ वाजता होणार असून यामध्ये वडवणी तालुक्यातील एकूण ग्रामपंचायत संख्या- ३५, अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंचपद- ६, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचपद- ०, नागरी मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचपद- ९, तर खुला प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचपद- २० अशाप्रकारे प्रवर्गनिहाय सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत संपन्न होणार असून याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन तहसीलदार श्रीकिशन सांगळे यांनी केले आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group