शेतकऱ्याच्या बांधावर कृषिदूत....
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी आधारित उद्योग उपक्रम अंतर्गत उदगीर येथील कृषी महाविद्यालयाचे अंतिम वर्षातील कृषिदूत बापू गव्हाणे काटेपिंपळगाव गावात दाखल झाले. या कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रम व प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जात आहे.शेतकऱ्यासाठी माती परिक्षणाची महत्त्व व माती नमुना संकलनाची शास्त्रीय पद्धत, बीजप्रक्रिया, अन्नप्रक्रिया,एकात्मिक तन व्यवस्थापन,एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, आधुनिक मोबाईल तंत्रज्ञानाचा शेतीत सुयोग्य वापर,जैविक शेती तंत्रज्ञान,फळबाग लागवड आदी विषयांवर चर्चा सत्रे व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले.पारंपरिक शेती पद्धतीलाआधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस मदत होईल, असे कृषी दूतांचे मत आहे.या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ जी.बी.अडसूळ ,कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. डी.झोडगे, डॉ एल.व्ही.पिंपळपल्ले
आदींचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS