*
गंगाखेड= उद्या शुक्रवारी महाराष्ट्रभर होत असलेल्या ढोल बजाओ आंदोलनात धनगर साम्राज्य सेना सक्रिय सहभागी होत असल्याची माहिती संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली.
लोकनेते गोपीचंद पडळकर यांनी हाक दिलेल्या ढोल बजाओ सरकार जगाओ या आंदोलनाची तयारी झालेली आहे. शुक्रवारी महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायत, नगर परिषद, तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय व मंदिराच्या आवारात ढोल वाजवून या सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एस टी चे प्रमाणपत्र तात्काळ हातात घ्यावे या मागणीसाठी हे आंदोलन होत आहे. या महाराष्ट्रव्यापी आंदोलनात धनगर साम्राज्य सेनेचे प्रत्येक जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी सक्रीय सहभागी होणार आहेत .कोरोना महामारी च्या काळात शासकीय नियमांचे पालन करत या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केले आहे. यासंदर्भात गंगाखेड तहसीलदार यांना निवेदन दिलें. यावेळीसतीश भाऊ शिंदे, जयदेव मिशे, सदाशिव कुंडगीर, यशवंत लवटे ,राम भंडारे, दत्तात्रय बिडगर, बालासाहेब कुकडे,राखमाजी लवटे उपस्थित होते.
COMMENTS