नांदेड : खडकूत येथील किया शोरूमसमोर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वाहनातून आलेल्या पथकाने मोटारसायकली तात्काळ हटविण्याचे आदेश दिल्याने काही काळ वाहनधारकांमध्ये गोंधळ व धावपळ उडाली. या घटनेदरम्यान संबंधित पथकाकडून नागरिकांना धमकावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, परिसरातील व्यावसायिकांकडून आर्थिक वसुली केली जात असल्याच्या चर्चेचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शुक्रवार, दिनांक २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता खडकूत येथील किया शोरूममध्ये वाहन सर्व्हिसिंगसाठी सीटू चे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड गेले होते.
त्यावेळी हा प्रकार निदर्शनास आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची चारचाकी गाडी सायरन वाजवत शोरूमसमोर आली. गाडीमध्ये अंदाजे ७ ते ८ व्यक्ती असल्याचे दिसून आले असून त्यापैकी काही जणांनी खाकी रंगाचे कपडे परिधान केले होते.जे की पोलीस नव्हते परंतु पोलीस असल्याचे दाखवत होते.
गाडीतील एका साध्या वेशातील व्यक्तीने ध्वनिक्षेपकाद्वारे शोरूमसमोरील मोटारसायकली तात्काळ हटविण्याची सूचना केली. वाहने न हटवल्यास जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा आदेश दिला.
शोरूममधील कामगार व ग्राहकांच्या अंदाजे ७०ते ८० मोटारसायकली मुख्य महामार्गापासून ६० ते ७० फूट अंतरावर असलेल्या मोकळ्या जागेत उभ्या होत्या. मुख्य रस्ता आणि वाहनांमध्ये एक मोठी १५ ते २० फुटाची नाली/मोकळी जागा असल्याने या वाहनांमुळे महामार्गावरील वाहतुकीला प्रत्यक्ष अडथळा निर्माण होत नाही ही वस्तुस्थिती आहे.
दरम्यान, संबंधित पथकाच्या वाहनाजवळ एका फ्रुट मार्केट मधील युवकाचा कर्मचाऱ्यांशी वाद सुरू असल्याचे दिसून आले. या युवकाने शहराकडे येणाऱ्या रस्त्यावरील फ्रूट मार्केट परिसरातील एका फळ विक्रेत्याकडून संबंधित पथकातील व्यक्तींनी ६ हजार रुपये घेतल्याचा आरोप केला असून, ही रक्कम परत करण्याची मागणी त्याने केली आहे.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संबंधित पथकाच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही स्थानिकांनी संबंधित पथकाकडून व्यावसायिकांकडून नियमित पैसे वसूल करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा असल्याचे सांगितले आहे. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, त्याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
किया शोरूम च्या अगदी बाजूला पेट्रोल पंप असून त्या पंपा वर सीएनजी भरण्यासाठी आलेल्या चार चाकी वाहनाणांची रांग अर्धा किलोमीटर असते परंतु तेथे कार्यवाही केली जात नाही म्हणून ही घटना भेदभाव पूर्ण व आर्थिक वसुलीसाठी घडली असावी यांस वाव आहे.
या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून संबंधित पथकाला देण्यात आलेले अधिकार, वाहन जप्तीची कायदेशीर प्रक्रिया, तसेच आर्थिक वसुलीच्या आरोपांची सत्यता तपासण्यात यावी, अशी मागणी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी केली आहे.
संबंधित परिसरातील CCTV फुटेज, NHAI वाहनाचे GPS/कॅमेरा रेकॉर्ड, पथकातील कर्मचाऱ्यांची ओळख व त्या दिवशीच्या कारवाईचे आदेश तपासल्यास या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी केली आहे.
आठ दिवसाच्या आत संबंधित पथकावर केलेल्या कार्यवाही चा अहवाल संघटनेस उपलब्ध करून द्यावा, कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालया समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे प्रकल्प संचालक यांना दिला आहे.
-कॉ. गंगाधर गायकवाड,
जनरल सेक्रेटरी CITU नांदेड जिल्हा कमिटी.
मो. 7709217188
दि. 22 ऑगस्ट 2026

COMMENTS