नांदेड प्रतिनिधी नांदेड शहरातून वाहणारी गोदावरी नदी ही मराठवाड्यातील एक प्रमुख जीवन वाहिनी असून तिला दक्षिणगंगा म्हणून ओळखले जाते विष्णुपुरी...
नांदेड प्रतिनिधी नांदेड शहरातून वाहणारी गोदावरी नदी ही मराठवाड्यातील एक प्रमुख जीवन वाहिनी असून तिला दक्षिणगंगा म्हणून ओळखले जाते विष्णुपुरी धरण ( शंकराव चव्हाण प्रकल्प) मूळ या नदीचे पात्र नांदेडमध्ये मोठे झाले आहे या नदीकाठावर गोवर्धन घाट प्रसिद्ध गुरुद्वारा व अनेक मंदिरे आहे जे धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते पण सध्या स्थितीत पवित्र स्थान व धार्मिक ठिकाणी बाहेरगावून येणाऱ्या नागरिकांना अंघोळ करण्यासाठी गोदावरीचे पाणी दूषित झाले असल्यामुळे त्यांना स्नान करता येणार नाही अशी दैनिक अवस्था या नांदेड शहरातील वाहणाऱ्या नाल्याचे व गटाराचे पाणी थेट गोदावरी नदीमध्ये मिसळत असल्यामुळे गोदावरी गंगा ही गटारगंगा झाल्याच्या अवस्थेत दिसून येत आहे या गोदावरी नदीकिनारी त्या पाण्याची दुर्गंधी येत आहे. या गोदावरी नदीला अनेक पवित्र घाट आहेत हे शहर नदीचे नाभी स्थान मानले जाते.
नांदेड शहरातील गोदावरी नदीवर विष्णुपुरी प्रकल्प आहे जे पाणी नांदेड शहरातील नागरिकांना पुरवठा व सिंचनासाठी अति महत्त्वाचे आहे पण सध्या स्थितीत विष्णुपुरी धरणाच्या खालील भागातील म्हणजेच गुरुद्वारा जुना मोंढा शनिदेव मंदिर गोवर्धन घाट देगलूर नाका वाजेगाव या परिसरातील गोदावरीच्या पाणी दुर्गंधी पसरली आहे . महापालिकेच्या वतीने अनेक वेळा गोदावरी नदी हे शुद्ध पवित्र नदी करण्याचे अनेक वेळा निवडणुकी वेळी आश्वासन दिले जाते पण या ठिकाणी निवडून आल्यानंतर व सत्ता स्थापन झाल्यानंतर गोदावरीकडे न पाहणाऱ्या नेते मंडळीने एक वेळेस देगलूर नाका व नावघाट फुला जवळील गोदावरीचे पाणी कसे आहे हे पाहून ते नांदेड शहरातील जनतेला दाखवावे की गोदावरी नदी ही पवित्र नदी आहे का.?
या गोदावरी नदी काठावर रामघाट बावणगणपती घाट व गोवर्धन घाट यासारखे पवित्र स्थानी आहेत.
त्यामुळे नांदेड शहरातील गटार आणि नारीचे पाणी गोदावरी नदीमध्ये मिश्रित होत असल्यामुळे गोदावरी गंगेचे पाणी दुर्गंधीमुळे ते पाणी जनावरांना देखील पिण्यायोग्य नाही अशी भयानक स्थिती गोदावरी नदीची नांदेड शहरातील नेतेमंडळीने करून ठेवली आहे असे जाणकार नागरिक बोलून दाखवत आहेत

COMMENTS