दि. 14 मार्च ता.प्र.
शेतीमालाच्या हमी भावासाठी शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली गावोगावीचे शेतकरी एकत्रित येत आहेत. आज मौजे कोपरा ता. किनवट येथील महादेव मंदिरात शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सदरील बैठकीस आकाश मधुकर मुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी शाखा स्थापन करण्यात आली असून
शाखाप्रमुख रामेश्वर दत्ता केंद्रे, कृष्णा केंद्रे उपाध्यक्ष, सचिव नागेश सुभाष चंचलवाड, सदस्य कृष्णा बालाजी मुंडे, मारोती माधव केंद्रे, लक्ष्मण मुंडे, शंकर चंद्रे, रामदास माधव बैलवाड, गजानन तानाजी बैलवाड, रामकिशन आकुलवाड, श्रीरंग केंद्रे, अवधूत चंचलवाड, परमेश्वर धोंडीबा मुंडे, अंगद मुंडे, रामराव बैलवाड, पंढरी बैलवाड, तुकाराम केंद्रे, सोपान अशोक बैलवाड, दयाराम सिताराम बैलवाड, उत्तम सादलवाड, उत्तम केंद्रे यांची निवड करण्यात आली.
उपस्थित शेतकऱ्यांनी यावेळी संघटनेची शपथ घेतली. तसेच 20 मार्च रोजी सकाळी 11.00 वाजता भगवान बाबा चौक बोधडी बु. ता. किनवट येथे होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी बंधू भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.

COMMENTS