*'यशवंत ' येथील डॉ.अजय गव्हाणे यांना जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक*

नांदेड:( दि.१५ डिसेंबर २०२४) 

          मास्टर्स गेम्स असोसिएशन, महाराष्ट्रतर्फे आयोजित पाचव्या  राज्यस्तरीय मास्टर्स गेम्स: २०२४, नाशिक येथील जलतरण स्पर्धेत श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख व प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय वसंतराव गव्हाणे यांना २०० मीटर्स वैयक्तिक मिडले जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.

          स्व.मीनाताई ठाकरे स्टेडियम अंतर्गत स्व. श्रीकांत ठाकरे जलतरणीका स्पर्धास्थळी जलतरणपटू प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर आणि डॉ. श्रीरंग सटवाजी बोडके यांनी विजयी होण्यासाठी सहकार्य व प्रोत्साहन दिले. 

               मास्टर्स गेम्स असोसिएशनचे महाराष्ट्र सचिव श्री.बाळा चव्हाण यांच्या हस्ते सुवर्णपदक व प्रमाणपत्र प्रदान करून डॉ.अजय गव्हाणे यांचा यथोचित गौरव करण्यात आला. 

         या सुयशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य व संस्थेचे कार्यकारणी सदस्य श्री. नरेंद्र चव्हाण आणि माजी प्र-कुलगुरु तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे  यांनी अभिनंदन आणि भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छापर प्रोत्साहन दिले.

           तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ. हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल. व्ही. पदमाराणी राव, प्रबंधक संदीप पाटील, डॉ.मनोज पैंजणे, डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ.बशीर बारी, डॉ. विजय भोसले, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, डॉ. साईनाथ शाहू, डॉ.प्रवीण तामसेकर, डॉ. मदन अंबोरे, डॉ. मीरा फड, डॉ.शिवदास शिंदे, डॉ.श्रीकांत जाधव, डॉ.शिवराज शिरसाठ, डॉ. अजय टेंगसे, डॉ.संभाजी वर्ताळे, प्रा. चैतन्य देशमुख, डॉ.गौतम दुथडे, डॉ. बालाजी भोसले, डॉ.दिगंबर भोसले, डॉ. शिवराज बोकडे, प्रा.श्रीकांत सोमठाणकर, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रा.गुरुप्रसाद चौसटे, डॉ.अजय मुठे, डॉ.एम.एम.व्ही.बेग, डॉ. धनराज भुरे, डॉ.एकनाथ मिरकुटे, शिवाजी वाडीकर, पोशट्टी अवधूतवार आदी हितचिंतक आणि मित्रांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या