शासकीय तंत्रनिकेतन येथे 12 मार्च रोजी तांत्रिक प्रदर्शन

नांदेड दि. 8 : शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथील विविध शाखांच्या विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट्सचे तांत्रिक प्रदर्शन (एक्झिबिशन) दिनांक 12 मार्च 2024 रोजी दुपारी 2 ते 5 यावेळेत आयोजित करण्यात आले आहे. दहावी, बारावी (विज्ञान) परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी विविध शाखेंची माहिती (विद्युत, माहिती तंत्रज्ञान, यंत्र, स्थापत्य, वैद्यकीय अनुविद्युत, उत्पादन) व्हावी तसेच संस्थेतील अंतिम वर्ष विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या तांत्रिक प्रोजेक्ट्स पाहून विद्यार्थ्यांच्या प्रगती संदर्भात जाणून घेण्याची ही उत्तम संधी आहे.

या प्रदर्शनासाठी कोणतेही शुल्क नसून प्रदर्शनास दहावी, बारावी (विज्ञान) परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती अवगत करावी, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांनी केले आहे.

0000

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज