सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी
काही दिवसांपासून तालुक्याला जाण्यासाठी रस्ता करण्याची मोहीम हाती घेण्यात आली खरी!मात्र या रस्त्याला ग्रहण लागले आहे ते दलालीचे आणि पोटगुत्तेदारांचे त्यामुळेच या रस्त्याच्या कामावरुन प्रवास करतांना प्रवाशांना हाल सोसावे लागत आहेत.मागील अनेक दिवसांपासून सोनपेठ तालुक्याला जाण्यासाठी चांगले रस्ते नसल्याने सोनपेठ तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून आंदोलने होऊन या आंदोलनाची दखल राज्यकर्त्यांनी घेतली होती.परळीकडून येणारे रस्ते चांगले करण्यात प्रशासनास यश आले होते.अजूनही जिल्ह्यातून सोनपेठला येण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने प्रवाशांना जीव हातात घेऊन सोनपेठ गाठावे लागत आहे.यात शिर्सीमार्गे सोनपेठचे काम चालू असल्याने येथील रस्त्यावरून प्रवास करताना धुळीचे लोट उडून अपघात घडत असल्याचा प्रकार समोर आला आहे दररोज छोटे-मोठे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरीही बाहेर राज्यातील सदरील काम करणाऱ्या एजन्सीने रस्त्यावर पाणी टाकले नसल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.सध्या ऊस तोडणी हंगाम यासह शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेते आणण्याचा हंगाम चालू असल्याने रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.उकरलेला रस्ता त्यावर मातीमिश्रित खडी असे काम शेळगाव ते सोनपेठ चालू आहे.मात्र या चालु कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रण अधिकाऱ्याचे नियंत्रण राहिले नसल्याने गुत्तेदार आपल्या मर्जीप्रमाणे काम करून प्रवाशांच्या जीविताशी खेळत आहे.
*नियंत्रण अधिकारी असणारे प्रदीप व्हटकर यांच्याशी या रस्त्यावर पाणी टाकत नसल्याबाबत प्रवाशांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता.त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.यामुळे संतापलेल्या अपघातग्रस्त प्रवाशांनी तक्रार करणार असल्याची तंबी देताच बघतो!एवढेच उत्तर व्हटकर यांनी दिले.मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रदीप व्हटकर हे या रस्त्यावर नियंत्रणअधिकारी म्हणून कार्यरत आहेत.मात्र त्यांचे नियंत्रण नसल्यानेच या चालू रस्त्यावर पाणी टाकले जात नसल्याने धूळ उडून अपघात घडत आहेत.अशा नियंत्रणअधिकाऱ्यांमुळे रस्ता चांगला होईल का?असा सवालच उपस्थित केला जात आहे.*

COMMENTS