संकल्प प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह ,आशा मोमेड,शिवसेना उपनेत्या मीनाताई कांबळे,संगीता अहिर ऐश्वर्या अहिर दि...
![]() |
| संकल्प प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह ,आशा मोमेड,शिवसेना उपनेत्या मीनाताई कांबळे,संगीता अहिर ऐश्वर्या अहिर दिसत आहेत. |
*मुंबई, दि. २५ नोव्हेंबर २०२० :* दक्षिण मुंबईत नागपाडा येथील रेड-लाईट परिसरात एका कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रियांना प्रती मास भेडसवणाऱ्या समस्येवर तसेच स्वच्छतेबाबत महिलांमध्ये नुकतीच जनजागृती करण्यात आली. मुंबईच्या सामाजिक उद्योजिका संगीता अहिर आणि त्यांची कन्या ऐश्वर्या अहिर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी आई आणि लेक अशा दोघीनी मिळून नॅपकिन्स आणि माहितीपत्रकांचे वाटप केले. मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर, मीनाताई कांबळी आणि आशाताई मामिडी यांच्या उपस्थितीत हा कर्यक्रम झाला.
या संलकल्पनेची मूळ मांडणी ऐश्वर्या अहिर यांनी केली आहे.
स्त्रियांना प्रती मास भेडसवणाऱ्या समस्येवर तसेच स्वच्छतेबाबत
सर्वांनी मदत करणे, हा त्यांचा अधिकार आहे,यावर ऐश्वर्या यांचा विश्वास आहे. तसेच त्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. सध्या भारतातील १५ ते २४ वयोगटातील सुमारे ४० टक्के किशोरवयीन मुली आणि महिला या या त्रासाने त्रस्त आहेत.त्यांच्या मध्ये या संदर्भात सुरक्षितता आणि आरोग्यदायी जीवन पद्धतीबाबत जागरूकता नाही. देशातील महिलांना प्रतिमास भेडसावणाऱ्या समस्ये बाबत भयानक स्थिती असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे.
या जनजागृती कार्यक्रमासंदर्भात बोलताना, संगीता अहिर यांनी सांगितले कि, "मी स्वत: एक महिला आणि दोन मुलींची आई म्हणून, वर निर्दिष्ट केलेली स्त्री समस्या महत्वाची मानते. त्या बाबत स्वच्छतेचा अधिकार हा त्यांचा मूलभूत अधिकार असला तरी भारतात या विषयाकडे अनेक वर्षे दुर्लक्षित केले गेले आहे. मुंबईत या महत्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे." त्या पुढे म्हणाल्या कि, "स्वच्छता किट पुरविण्यासोबतच महिलांना त्यांच्या स्वतःच्या शरीरिक स्वच्छतेबाबत आम्ही जनजगृती करीत आहोत.वरील प्रश्नावर जनजागृती जगभरातील महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी फार महत्वपूर्ण ठरते.महिलांना वरील आरोग्यविषयक समस्येवर व्यवस्थापन आणि सुरक्षितता मिळविण्यास स्वातंत्र्य मिळायला हवे. आपल्या देशात वास्तविक समान न्यायच्या द्रुष्टीने काम करण्यासाठी आम्हाला सर्वानी सहकार्य करावे," असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या विषयाशिवाय, संगीता अहिर यांनी त्यांचे पती सचिन अहिर यांच्यासोबत अनेक सामाजिक संस्थामार्फत कार्यरत आहेत. श्री संकल्प प्रतिष्ठान आणि मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांच्या त्या सहसंस्थापक आहेत. वंचित तसेच दुर्लक्षित लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. तसेच एक जागतिक शहर म्ह्णून मुंबईची प्रतिष्ठा कायम ठेवण्याच्या उद्देशाने अनेक स्वच्छता मोहीम सुद्धा त्यांनी राबविल्या आहेत. विविध प्रशिक्षण कार्यक्रम, वैद्यकीय शिबिरे यांचे आयोजन तसेच सार्वजनिक जनजागृती कार्यक्रमाद्वारे महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या अखंडित कार्यरत आहेत. समाजासाठी काहीतरी करण्याच्या त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे, द लाईट ऑफ वुमेन या जागतिक उपक्रमाच्या राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. हा उपक्रम जगभरातील महिलांच्या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी समर्पित आहे.
◆◆◆

COMMENTS