कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, शेतकऱ्यांसाठीच्या धडक मोर्चात काँग्रेसचा सहभाग पण सरकारकडून मोर्चावर दडपशाही: हर्षवर्धन सपकाळ.

सरंडर मोदी सरकारमुळेच देशातील जनतेला महागाईचे चटके, मोदी सरकारकडे इंधन धोरणच नाही  नीटची (NEET) व्यवस्थाही भ्रष्ट, मागील ७ वर्षात ७१ वेळा नी...

सरंडर मोदी सरकारमुळेच देशातील जनतेला महागाईचे चटके, मोदी सरकारकडे इंधन धोरणच नाही 

नीटची (NEET) व्यवस्थाही भ्रष्ट, मागील ७ वर्षात ७१ वेळा नीट पेपर फुटले पण मोदी सरकारचे विद्यार्थ्यांकडेही दुर्लक्ष.

मुंबई, दि. १५ मे २०२६..कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. मागील तीन महिन्यापासून या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी आंदोलन सुरु आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा निघाला असताना पोलिसांच्या मतदीने शेतकरी विरोधी भाजपा सरकारने अडवणूक केली पण सरकारच्या या दडपशाहीला आम्ही भिक घालत नाही, कोकणातील शेतकऱ्यांच्या पदरात भरीव मदत पडे पर्यंत हा लढा थांबणार नाही अशा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी यासाठी गिरगाव चौपाटीपासून वर्षा बंगल्यावर मोर्चा काढण्यात येणार होता त्यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, शिवसेना नेते विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, मराठी भाषा समितीचे दीपक पवार, प्रकाश रेड्डी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी दडशाही करून मंत्रालय परिसरातील शिवसेनेचे कार्यालय शिवालय येथून ताब्यात घेतले. काही जणांना डोंगरी पोलीस स्टेशन आणि काही जणांना आझाद मैदानात घेऊन गेले. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने आधीच जाहीर पाठिंबा दिलेला आहे. भाजपा महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अन्यथा १५ मे रोजी मोर्चा काढू असा इशाराही दिला होता पण भाजपा महायुती सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने कोकणातील शेतकऱ्यांसाठी आजच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सरकार शेतकरी, कामगार, विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठीच मोर्चे व आंदोलनांना परवानगी देत नाही. शेतकऱ्यांसाठीचा हा मोर्चा लोकशाही मार्गाने काढण्यात येत होता पण सरकार मात्र लोकशाही मुल्य पायदळी तुडवत आहे. जब जब सरकार डरती है, पुलिस को आगे करती है, असे म्हणून सरकारने आंबा उत्पादक शेतक-यांना हेक्टरी ५ लाख रुपये व काजू उत्पादक शेतक-यांना हेक्टरी ३ लाख रुपये मदत द्यावी अशी आमची मागणी आहे ती पूर्ण होईपर्यंत शेतकरी संघर्ष करत राहतील. सरेंडर मोदी सरकारमुळे पेट्रोल व डिझेलची दरवाढ.. 

मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व सीएनजी दरवाढ करून महागाईच्या आगीत होरपळत असलेल्या जनतेला आणखी मोठ्या दरीत लोटले आहे. ही इंधन दरवाढ होणारच होती पण पाच राज्यातील निवडणुकीत भाजपाला फटका बसू नये यासाठी रोखून धरली होती आणि इंधनाचे दर आणखीही वाढू शकतात. मोदी सरकार पूर्णपणे अमेरिकेला सरेंडर झाल्यामुळेच देशातील जनतेला महागाईचे चटके बसत असत आहेत. पेट्रोल, डिझेलची दरवाढ ही काय अचानक झालेली नाही. मोदी सरकारकडे कोणतेही नियोजन नाही, इंधन धोरण नाही. भारत अनेक वर्षांपासून आपला मित्रराष्ट्र रशियाकडून रुपयामध्ये तेल घेत होता पण अमेरिकेने रशियाकडून तेल घेण्यास मज्जाव केला. रशियाकडून पूर्वीप्रमाणे तेल घेण्याचे धोरण कायम राहिले असते तर ही आज ही वेळ आली नसती पण मोदी सरकार अमेरिकेच्या दबावाखाली काम करत असल्याने त्याचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

नीट (NEET) परिक्षा व्यवस्थाही भ्रष्ट..

नीट (NEET) पेपर फुटीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मागील ७ वर्षात ७१ वेळा नीट पेपर फुटलेले आहेत. लाखो विद्यार्थी मोठे परिश्रम करतात, विद्यार्थ्यांप्रमाणे पालकही आपल्या मुलांसाठी डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहत असतात पण सर्व व्यवस्थाच भ्रष्ट झालेली आहे, त्यात नीट परिक्षेची व्यवस्थाही भ्रष्ट झालेली आहे, हे अत्यंत गंभीर आहे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, हे आणखी गंभीर आहे, असेही सपकाळ म्हणाले..

पंतप्रधानांच्या सुरक्षेवरूनही भाजपाचे राजकारण..

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काटकसरीचे आवाहन करत स्वतःची सुरक्षाही कमी केली, त्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधानांसारखे प्रत्येक नागरिक व त्याची सुरक्षाही महत्वाची आहे. आपल्या देशाच्या दोन पतप्रधानांनी जीव गमावला आहे, पंतप्रधानांची सुरक्षा महत्वाची आहे पण भारतीय जनता पक्ष सुरक्षेवरुनही राजकारण करत आहे, असे स्पष्ट करून, माझ्याकडे कोणताही गाड्यांचा ताफा नाही, मी अनेकदा पदयात्राही करतो, सर्वसामान्य जनतेप्रमाणे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतो, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी ‘बिनडोक’ म्हटले यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की,.. देवेंद्र फडणवीस यांना असे वाटते की, सर्व अक्कल ही फक्त त्यांच्याकडे, भाजपा व आरएसएसवाल्यांकडेच आहे म्हणून ते इतर सर्वांना ‘बिनडोक’ म्हणून अपमानित करत असतात, हा अहंकार वर्षानुवर्षापासून त्यांच्या प्रवृत्तीत आहे, असेही सपकाळ म्हणाले..

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group