ता. प्र. दि. 23
आदिवासी बहुल असलेल्या किनवट माहूर तालुक्यातील सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीरे आयोजित करावेत अशी मागणी मोरेश्वर महिला विकास संस्था भोकर चे अध्यक्ष तथा शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांनी केली.
इस्लापूर येथील संत फुलाजी बाबा अनुदानीत आश्रम शाळेतील 7 व्या वर्गाचा विद्यार्थी सुरेश अंकुश वाळके वय 14 या विद्यार्थ्याचा दि. 16 एप्रिल रोजी विहिरीत बुडून मृत्यू झाला. अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे यावेळी त्याच्या सोबत सहा विद्यार्थी होते. आपत्ती व्यवस्थापनाचे धडे या विद्यार्थ्यांना शिकवले गेले असते तर सोबत असलेल्या विद्यार्थ्यांनी नक्कीच सुरेश चा जीव वाचवला असता. त्यासाठी किनवट माहूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात यावेत. गरज पडल्यास आपल्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून योग्य ती भूमिका पार पाडली जाईल, अशी मागणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. यावेळी संतोष घुगे व राम मुंडे सोबत होते.

COMMENTS