नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
भारतिय संविधानाचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरीनिर्वाण दिनानीमित्त 6 डिसेंबर रोजी शंकरनगर ता.बिलोली येथे ६४ रक्तदात्यांनी रक्तदान करुन महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रारंभी सकाळी 11 वाजता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराला सुरूवात करुन ६४रक्तदात्यांनी रक्तदान केले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन रामतिर्थ पोलीस ठाण्याचे आर.एस. मुत्योपोड , सामाजिक कार्यकर्ते माधवदादा वाघमारे, उपपोलिस निरीक्षक घाडगे,डाॅ शिवाजी कागडे, माधवराव कंधारे,मारोतराव वडे,हणमंतराव तोडे, रिपब्लीकन सेना जिल्हा आध्यक्ष अनिल सिरसे,पप्पु सोनकांबळे,दिलीप घाटे आदी उपस्थित होती. महारक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी पत्रकार भास्कर भेदेकर ,सुनिल कांबळे, नागसेन जिगळेकर, गंगाधर कांबळे,दिपक कांबळे,ब्रम्हा कांबळे,अशिफ शेख नितीन कांबळे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील नागरिकांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

COMMENTS