अंबाजोगाई वार्ताहर
अंबाजोगाई येथे महामानवास अभिवादन
करतांना फुले ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष अॅड हनुमंत राऊत अॅड बी.जी.केंद्रे , अॅड महेंद्र राऊत,चांगदेव तरकसे व अनेक जनांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न या वेळी महामानवास अभिवादन करते वेळी फुले ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष अॅड राऊत म्हणाले कि " महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 5 डिसेंबर च्या सायंकाळी "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या पुस्तकाच्या _प्रास्ताविक_ व _परिचय_ या दोन प्रकरणाच्या पुरती नंतर रात्री म्हणजेच 6 डिसेंबर 1956 रोजी 12.15 वा. दिल्लीच्या निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण झाले, तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांचे वय 64 वर्षे 7 महिने होते. चैत्यभूमी मुंबई येथे बाबासाहेबांचा अंत्यविधी करण्यात आला. तोच दुःखमय दिन म्हणजे आजचा महापरिनिर्वाण दिन होय. *डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ ,राजनीती तज्ञ ,तत्त्वज्ञ व समाजसुधारक तथा भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून जगविख्यात आहेत . त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्यता निवारणासाठी सामाजिक चळवळ उभारली, तसेच महिलांच्या व कामगारांच्या हक्काचे समर्थन केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री व स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते . त्यांनी भारतीय बौद्ध धर्माचे पुनर्जीवन केले . देशात बाबासाहेबांना समर्पित विद्यार्थी दिन, ज्ञान दिन ,वकील दिन, व सामाजिक सबलीकरण दिन असे अनेक दिन साजरा होतात असे विचार आपण आज जाणून घेतले पाहिजे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो प्राशन करतो तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहात नाही ." बाबसाहेबांनी हा संदेश देऊन जातीवादी चिखलात दबलेल्या समाजाला शिक्षित होऊन संघटित व्हा व संघर्ष करण्याचा मार्ग दाखवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज महानिर्वान दिना निमित्त आपले विचार मांडले फुले ब्रिगेड संघटनेचे बिड जिल्हा अध्यक्ष अॅड हनुमंत राऊत यांनी आज त्यांच्या आठवणींना व कार्याला उजाळा दिला.

COMMENTS