केज दि २९( प्रतिनिधी)
लोकशाही भारतात असलेले गुलामगिरीचे वास्तव दूर करण्यासाठीक्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आजही प्रेरणा देणारे असल्याचे मत प्राचार्य हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले. ते सरस्वती महाविद्यालयात महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन नॅक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतीक विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ जी बी पाटील हे होते. यावेळी प्राचार्य विजय शिनगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिनगारे म्हणाले की, शिक्षण व्यवस्थेचे बाजारीकरण आणि सरकारकडून शिक्षणावरील होणारा अल्प खर्च यामुळे देशाच्या भवितव्या विषयी चिंता वाटत वाटते असे सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ पाटील म्हणाले की, फुले-शाहू-आंबेडकर या महामानवानी दिलेला वारसा आपण प्रत्येकाने पुढे चालवणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा के एम धिमधिमे यांनी मानले. यावेळी प्रा डॉ ए एस डांगे, प्रा के ए वरळे, प्रा डॉ एस ए बुरगे, प्रा डॉ व्ही एस आहेर, प्रा एस एल केंद्रे, प्रा एच ए शिंदे, प्रा डॉ एस डी आरडले, प्रा डी के रामरुले, प्रा एस एम घोडके, प्रा डॉ एम एस चाटे, प्रा एल पी तोंडाकूर, प्रा डॉ एन बी कराळे, प्रा डॉ जे के जाधव व शिक्षकेत्तर कर्मचारी पी आर गालफाडे, एल एम भांडवलकर, एल एन शेळके, आर आर मोरे, ए ए इटकर आदी उपस्थित होते.

COMMENTS