नरेंद्र येरावार
अर्जापूर ता.बिलोली येथील पानसरे महाविद्यालयात मंगळवार दि.२९ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेच्या शाखा नांदेड यांच्या वतीने अमृत युवा ऊर्जा व विश्वबंधुत्व पंधरवड्यानिमित्त एक दिवस राष्ट्रासाठी या विषयावर आधारित कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री सुभाषराव गायकवाड हे होते. तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. श्री ज्ञानेश्वर शिंदे होते. यांनी विद्यार्थ्यांना कायदा व कायदा पालन अशा प्रकारचे मार्गदर्शन केले. तसेच ज्ञान व शिक्षणाचे महत्त्व प्रतिपादन केले. दुसरे अतिथी व मार्गदर्शक म्हणून माजी वैद्यकीय अधिकारी कुंडलवाडी, येथील डॉ. नरेश बोधनकर हे होते.त्यांनी मानसिक आजार तसेच नशा मुक्तीवर आधारित विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नायगावचे व्यवस्थापन समिती सदस्य श्री लक्ष्मण बुद्धलवाड हेही उपस्थित होते. अमृत संस्था नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक श्री विश्वेश्वर जोशी यांनी आपल्या
प्रास्ताविकात अमृत संस्थेबद्दल व संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देऊन आजच्या कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. तर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना युवक संदेश यादरम्यान विद्यार्थ्यांशी उत्कृष्ट संवाद श्री विश्वेश्वर जोशी व प्रा. शिवकुमार सरकोंडावार यांनी केला.या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. डॉ.गोपाळ चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन व कार्यक्रमाध्यक्षांचे स्वागत तसेच सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी.बेलखेडे यांनी केले.तसेच स्टाफ सेक्रेटरी डॉ. जाधव डी.बी. उपप्राचार्य डॉ. गोविंद चौधरी व स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक डॉ.नारायण शिवशेटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. या प्रसंगी बहुसंख्येने प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचा उत्स्फूर्तn अशाप्रकारे सर्वांनी आनंद घेतला. उपप्राचार्य डॉ. गोविंद चौधरी यांच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली...
......

COMMENTS